ब्लॉगिंग, अफिलिएट मार्केटिंग, ईकॉमर्स वेबसाईट, युट्युब आणि ऑनलाईन पैसे कमवण्याचे मार्ग ह्या गोष्टींकडे कल वाढत आहे. काही वर्षांपूर्वी घरबसल्या ऑनलाईन पैसे कमवता येतात यावर कोणाचा विश्वास बसत नव्हता. मात्र अलीकडे तंत्रज्ञान युगात झालेली क्रांती आणि इंटरनेटचा वाढता वापर पाहता हे सहज शक्य होत आहे. शेअर ट्रेडिंग सारख्या विषयात सहसा कोणी पडत नसे, मात्र आज यात आवड निर्माण होत आहे. त्याचप्रकारे ब्लॉगिंग कडे देखील व्यवसायिक दृष्टीने पाहिजले जात आहे. (Niche meaning in Marathi)
ब्लॉगिंग हा एक असा मार्ग आहे ज्यामध्ये आपली आवड जोपासता येते आणि पैसे देखील कमावता येतात. एखाद्या विषयावर लिहिलेला लेख म्हणजे ब्लॉग. ज्यावेळेस ब्लॉग सुरु करायचा असतो त्यावेळेस एक विशिष्ट विषय निवडला पाहिजे. उदा . तंत्रज्ञान, निसर्ग, इतिहास, पर्यटन, पाककला आणि इतर. अशा विषयांना Niche असे संबोधले जाते. म्हणून ब्लॉग सुरु करण्यापूर्वी विषय निवडणे महत्वाचे ठरते.
वेबसाईट/ब्लॉग सोबतच इतर माध्यमात देखील Niche निवडावी लागते. उदा युट्युब चॅनेल, अफिलिएट मार्केटिंग. जर विषय निवडताना आपण आपल्या आवडीचा विषय निवडला नाही तर काही कालावधी नंतर कंटाळा येतो आणि ब्लॉगिंग बंद होते. त्यामुळे आपली आवड असेल तोच विषय निवडावा जेणेकरून कंटाळा येणार नाही आणि आपले काम सुरु राहील.
आता प्रश्न येतो की पैसे कसे कमावता येऊ शकतात? जर आपण ब्लॉगिंग करत असाल तर वेबसाईट वर येणाऱ्या भेटींच्या (traffic) माध्यमातून पैसे कमाऊ शकता. म्हणजेच येणाऱ्या लोकांना जाहिराती दाखवल्या जाऊन पैसे कमावता येऊ शकतात. त्यासाठी Google Adsense हा पर्याय आहे. वेबसाईट/ब्लॉग वरील रिकाम्या जागेत जाहिरात दाखबवली जाते व वेबसाईट मालकाला त्याचा मोबदला दिला जातो. जेवढ्या जास्त भेटी येतील तेवढे जास्त पैसे मिळण्याची शक्यता असते.
अफिलिएट मार्केटिंग या प्रकारात एखाद्या वस्तू अथवा सेवांचे समीक्षण (review) केले जाते, वस्तू व सेवा विकल्या जातात आणि त्याबदल्यात काही मोबदला (commission) कमावला जातो. ज्या ब्रँडचा अथवा कंपनीचा प्रॉडक्ट विकला जातो ती कंपनी मोबदला देते. ब्लॉग, युट्युब या माध्यमातून अफिलिएट मार्केटिंग करता येते. जर अफिलिएट मार्केटिंग बद्दल सविस्तर माहिती हवी असेल तर “अफिलिएट मार्केटिंग म्हणजे काय?” हा विशेष लेख वाचा.
तर ब्लॉगिंग Niche म्हणजे एक विशिष्ट विषय (define subject). विशिष्ट विषयाला अनुसरून ब्लॉगिंग केले तर त्याचा फायदा जास्त होतो. जर वेगवेगळ्या विषयांवर आधारित आणि मिश्र पद्धतीने ब्लॉगिंग केले तर त्यातून कमाई कमी होते, त्यावर मर्यादा असतात. कुठल्याही मार्गाने पैसे कमवत असताना कष्ट हे घ्यावेच लागतात. ब्लॉगिंग हा झटपट श्रीमंत होण्याचा मार्ग नसला तरी सातत्य ठेवले तर चांगली कमाई करता येते.(Niche meaning in Marathi).
अलीकडील लेख
अमेझॉन वर प्रत्येक वर्षाच्या ऑक्टोबर मध्ये येणाऱ्या sale मध्ये वस्तू इतक्या स्वस्त का असतात? असा प्रश्न तुम्हाला पडत असेलच, तसेच या सेल मध्ये वस्तू विकत… Read More
NCB विषयी माहीती मराठी Narcotics Control Bureau ही एक गुप्तचर संस्था आहे जिचे प्रमुख काम हे अवैधपणे होणारी ड्रग्जची तस्करी थांबवणे तसेच त्यावर आळा घालणे… Read More
ऑनलाईन शॉपिंग आज स्मार्ट फोन आणि इंटरनेट आल्यामुळे आपणा सर्वाना कोणत्याही वस्तुची घरबसल्या खरेदी करणे अगदी सोपे झाले आहे. एका क्लीकवर आज आपण हजारो नही… Read More