Mutual Fund Information in Marathi
जेव्हा आपल्या मनात पैशांची गुंतवणुक करण्याचा विचार येत असतो तेव्हा आपल्यासमोर पहिले शेअर मार्केट, म्युच्युअल फंड आणि रिअल इस्टेट हे तीन पर्याय येतात. पण आपण जेव्हा लोकांकडुन ऐकतो की इथे पैसे गुंतवणे योग्य नाही इथे खुप धोका आहे तेव्हा आपल्या मनात देखील तेच विचार चालत असतात. कोणतीही माहीती न प्राप्त करता आपण खोटया अफवांवर विश्वास ठेवत असतो.
आपल्याही सोबत असा प्रकार घडु नये आणि आपण योग्य त्या ठिकाणी आपले पैसे गुंतवावे जेणेकरून आर्थिक लाभ होईल. आजच्या लेखातुन आपण म्युच्युअल फंडविषयी सविस्तर माहीती जाणुन घेणार आहोत. (Mutual Fund Information in Marathi)
म्युच्युअल फंड म्हणजे काय?
म्युच्युअल फंड हा एक निधी असतो ज्यामध्ये वेगवेगळया कंपनीने, तसेच सर्वसामान्य व्यक्तींनी आपले पैसे गुंतवलेले असतात. ह्या गुंतवणुकदारांनी गुंतवलेला सर्व पैसा हा वेगवेगळया ठिकाणी पैशांची गुंतवणुक करण्यासाठी उपयोगात आणला जात असतो. गुंतवणुकदारांनी जेवढे पैसे यात गुंतवलेले असतात त्यापेक्षा अधिक पटीने त्याला नफा मिळवुन देण्यासाठी इथे प्रयत्न केला जातो. हा निधी सर्व गुंतवणुकदारांकडून गोळा करण्याचे कार्य हे निधी व्यवस्थापकाचे म्हणजेच फंड मँनेजरचे असते. फंड मँनेजर हा सर्व गुंतवणुक दारांचे पैसे त्याच्याकडे जमा करतो आणि त्याच पैशांची योग्य ठिकाणी गूंतवणुक करून गुंतवणुकदारांना जास्तीत जास्त नफा प्राप्त करून देण्याचे काम करत असतो.
म्युच्युअल फंडमधुन मिळणारे फायदे कोणकोणते असतात?
● कोणताही गुंतवणुकदार कमीत कमी पैशातही म्युच्युअल फंडमध्ये आपल्या पैशांची गुंतवणुक करू शकतो. इथे त्याच्यावर कोणतेही बंधन नसते की त्याला इतकेच ठारविक पैसे गुंतवावे लागतील.
● म्युच्युअल फंडमध्ये जे गुंतवणुकदार पैसे गुंतवत असतात ते आपले पैसे वेगवेगळया ठिकाणी गुंतवू शकतात. जसे की गोल्ड किंवा स्टाँक्स इत्यादी.
● ह्या मध्ये सिस्टमँटिक इनव्हेस्टमेंट प्लँन – SIP देखील असतो.
● म्युच्युअल फंडमध्ये पैसे गुंतवण्यासाठी आपल्याला कोणतेही डिमँट अकाऊंट उघडावे लागत नाही.
● म्युच्युअल फंडचा सगळयात मोठा फायदा हा असतो की इथे आपल्या पैशांचे व्यवस्थापन तसेच गुंतवणुक गुंतवणुक तज्ञांकडुन केले जात असते.
● म्युच्युअल फंडमध्ये आपल्याला पाहिजे तेव्हा यातुन आपण आपले पैसे काढु देखील शकतो म्हणजेच यात लिक्वीडीटी सुदधा आहे.
● म्युच्युअल फंडमध्ये आपल्याला एकदम लो काँस्ट इन्वहेस्टमेंट करावी लागते.
● म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणुक करत असलेल्या गुंतवणुकदारांना भविष्यात चांगला रिटर्न देखील प्राप्त होतो.
● म्युच्युअल फंड हे सेबी रेजिस्टर असते. सेबी हे गुंतवणुकदारांच्या पैशांच्या सुरक्षिततेची हमी घेत असते.
● म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणुकदार आपले पैसे एकाच ठिकाणी न गुंतवता वेगवेगळया ठिकाणी गुंतवू शकतात. म्हणजेच डायव्हरसिफिकेशन देखील यात आपल्याला उपलब्ध करून दिले गेले आहे.

म्युच्युअल फंड मध्ये पैशांची गुंतवणुक करण्यात कोणती जोखीम असते?
● म्युच्युअल फंडमधून आपल्याला फिक्स रिटर्न मिळत नसतो येथे स्टाँक मार्केटप्रमाणेच भाव कमी जास्त होत असतात. त्यामुळे येथे फिक्स रिटर्न प्राप्त होत नसतो. जसा आपल्याला एफ. डी. तसेच पोस्टल सेविंग मध्ये मिळत असतो त्याप्रमाणे.
● काही म्युच्युअल फंडमध्ये काही स्कीममध्ये लाँक इन टाईम दिलेला असतो जो पुर्ण होईपर्यत आपण तिथून आपले गुंतवलेले पैसे काढु शकत नसतो म्हणुन आपली गरज म्हणजेच आपल्याला कधी आणि किती कालावधीने पैसे लागतील याचे नियोजन करूनच आपल्या सोयीसुविधेनुसार आपण योग्य स्कीम निवडुन आपल्या पैशांची गुंतवणुक करायला हवी.
● म्युच्युअल फंडमधून आपल्याला जो रिटर्न मिळत असतो त्यावर आपल्याला काही टँक्स देखील भरावा लागतो.
म्युच्युअल फंडमध्ये आपल्या पैशांची गुंतवणुक कशी करावी?
● आपल्याला जर म्युच्युअल फंडमध्ये आपल्या पैशांची गुंतवणुक करायची असेल तर आपण म्युच्युअल फंडच्या एखाद्या ट्रस्टेड आँफिशिअल वेबसाईटवर जाऊन देखील आँनलाईन आपले पैसे म्युच्युअल फंडमध्ये गुंतवू शकतो.
● तसेच आपल्याला जर आवश्यकता असेल तर आपण आपल्या पैशांची गुंतवणुक करण्याअगोदर कुठे आणि किती पैशांची गुंतवणुक करावी? हे जाणुन घेण्यासाठी एखाद्या तज्ञ म्युच्युअल फंड सल्लागाराकडून सल्ला देखील घेऊ शकतो.
● ह्यामध्ये दोन मार्ग असतात जर आपल्याला आपल्या पैशांची डायरेक्ट गुंतवणुक करायची असेल तर आपण म्युच्युअल फंडच्या डायरेक्ट प्लँन स्कीममध्ये आपले पैसे गुंतवू शकतो. पण जर आपल्याला एखाद्या तज्ञ म्युच्युअल फंड सल्लागाराचा सल्ला घेऊन आपल्या पैशांची गुंतवणुक करावयाची असेल तर अशावेळी आपण गुंतवणुक करण्यासाठी रेग्यूलर प्लँनची निवड करू शकतो.
● आपण जर आपल्या म्युच्युअल फंडमध्ये आपल्या पैशांची गुंतवणुक जर डायरेक्ट केली तर आपल्याला म्युच्युअल फंड सल्लागाराला जे कमिशन द्यावे लागते ते देण्याची कोणतीही गरज पडत नाही. आपण सरळ त्या म्युच्युअल फंडच्या आँफिशिअल वेबसाईटवर जाऊन आपल्या पैशांची गूंतवणुक करू शकतो. आवश्यकता पडल्यास आपण त्यांच्या आँफिसात जाऊन देखील आवश्यक ती कागदपत्रे जमा करू शकतो. (Mutual Fund Information in Marathi)
म्युच्युअल फंडचे प्रकार कोणकोणते आहेत?
1) इक्वीटी म्युच्युअल फंड :
2) डेब्ट म्युच्युअल फंड :
3) हायब्रिड म्युच्युअल फंड :
1) इक्वीटी म्युच्युअल फंड :
इक्वीटी म्युच्युअल फंड हा एक असा फंड असतो ज्यामधील लावलेले आपले सर्व पैसे स्टाँक मार्केटमध्ये गुंतवले जातात. इक्वीटी म्युच्युअल फंडमध्ये देखील वेगवेगळे प्रकार असतात ते पुढीलप्रमाणे:
● लार्ज कँप फंड
● स्माँल कँप फंड
● मिड कँप फंड
● सेक्टर फंड
● डायव्हर्सिटी इक्वीटी फंड
● डिव्हीडंड स्कीम
● इक्वीटी लिंक सेविंग स्कीम
● थीमेटीक फंड
2) डेब्ट म्युच्युअल फंड :
जो फंड आपण डेंचर तसेच डेबिट इन्स्ट्रुमेंमध्ये गुंतवत असतो त्या फंडलाच डेब्ट म्युच्युअल फंड असे म्हणतात. डेब्ट इन्स्ट्रुमेंट फंडचे चार प्रकार आहेत:
● गिल्ट फंड
● जंक बाँण्ड स्कीम
● फिक्स मँच्युरीटी प्लँन
● लिक्विड स्कीम
3) हायब्रिड म्युच्युअल फंड :
जो फंड आपण एकापेक्षा जास्त क्षेत्रात गुंतवत असतो त्यालाच हायब्रिड म्युच्युअल फंड असे म्हणतात. हायब्रिड म्युच्युअल फंडचे तीन प्रकार आहेत:
● मंथली इन्कम प्लँन
● बँलन्स फंड
● आर्बिटरेज फंड इत्यादी.
म्युच्युअल फंडची वैशिष्टये कोणकोणती आहेत?
● इथे गुंतवणुकदार कधीही कोणताही फंड खरेदी करू शकतो तसेच आपले फंड विकु देखील शकतो.त्याचे स्वातंत्र्य यात त्याला बहाल केले गेले आहे.
● इथे आपले फंड विकण्याचा तसेच एखाद्याचे तसेच इतर कोणतेही फंडची खरेदी करण्याचा कोणताही एक निश्चित कालावधी गुंतवणुकदारांना दिलेला नसतो. (Mutual Fund information in Marathi)