आजच्या ह्या धावपळीच्या महागाईच्या जीवणात आपल्याला प्रत्येकाला वाटत असते की किती दिवस नोकरी करावी? आता आपण स्वतःचा काहीतरी उद्योग धंदा टाकायला हवा आणि उद्योजक बनायला हवे पण खिशात पुरेसा पैसा नसल्यामुळे आपल्याला आपले हे उद्योजक होण्याचे स्वप्र पुर्ण करता येत नसते.
म्हणुन अशाच उद्योजक होऊ इच्छित व्यक्तींना उद्योजक बनता यावे आणि आपल्या देशात पण उद्योजकतेत वाढ व्हायला हवी, आपला देश उद्योग क्षेत्रात पुढे गेला पाहिजे व आपल्या देशातील बेरोजगारी संपुष्टात आली पाहिजे. यासाठीच म्हणुन प्रधानमंत्री मुद्रा योजनेची सुरुवात करण्यात आली. ज्या द्वारे आपण कर्ज उचलून शेती सोडुन शेतीशी संबंधित पाहिजे तो व्यवसाय सुरू शकतो. किंवा इतरही व्यवसाय देखील करू शकतो.
प्रधानप्रधानमंत्री मुद्रा योजना माहिती पाहत असताना ही एक मुद्रा ह्या संस्थेदवारे बँकेद्वारे चालु केलेली योजना आहे असे समजते. ज्याची सुरूवात 8 एप्रिल 2015 रोजी दिल्ली येथे केली गेली होती आणि ही सुरूवात भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी केली आहे.
आजच्या लेखात आपण ह्याच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या प्रधानमंत्री मुद्रा योजनेविषयी सविस्तर जाणुन घेणार आहोत. प्रधानमंत्री मुद्रा योजना काय आहे? प्रधानमंत्री मुद्रा योजना सुरू करण्यामागची केंद्र सरकारची उददिष्टे कोणकोणती आहेत? इत्यादी बाबींविषयी आपण जाणुन घेणार आहोत.
प्रधानमंत्री मुद्रा योजना MUDRA – Micro Units Development and Refinance Agency. ही एक अशी कर्ज योजना आहे ज्याची सुरूवात केंद्र सरकारने मुख्यत्वे छोटे उद्योग, व्यवसाय, व्यापार सुरू करण्यासाठी केली आहे. ही एक अशी योजना आहे जिच्यादवारे जनतेला म्हणजेच कोणत्याही व्यक्तीला आपला स्वताचा उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी छोटया रकमेच्या स्वरुपात कर्ज दिले जाते. प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत बँक ही आपल्याला लोन देण्याचे काम करत असते. त्याची हमी मुद्रा ही संस्था घेत असते. ह्या संस्थेची स्थापना SIDBI अंतर्गत केंद्र सरकारने केलेली आहे.
प्रधानमंत्री मुद्रा योजना सुरू करण्यामागची केंद्र सरकारची काही प्रमुख उददिष्टे आहेत ज्यांची पुर्तता करण्यासाठी सरकारने ही योजना सुरू केलेली आहे.ती उददिष्टे पुढीलप्रमाणे आहेत:
● भारतातील प्रत्येक नागरीकाला स्वयंरोजगार उभारता यावा स्वताच्या कतृत्वाच्या बळावर उद्योग व्यवसाय करता यावा हेच प्रधानमंत्री मुद्रा योजना सुरू करण्यामागचे केंद्र सरकारचे मुख्य उददिष्ट आहे.
● आपल्या भारतामध्ये छोटया उद्योग व्यवसायांची निर्मिती करून त्याच निर्माण केलेल्या छोटया उद्योग, व्यापार, व्यवसायादवारे तरुण तसेच बेरोजगार युवक युवतींना रोजगार प्राप्त करून देणे. तसेच ज्यांचा उद्योग व्यवसाय आधीपासुन चांगल्या पदधतीने चालत असेल त्यांना आपला उद्योग व्यवसाय अजुन उत्तम प्रकारे चालवता यावा तसेच त्यात वाढ करता यावी हे देखील प्रधानमंत्री मुद्रा योजना सुरू करण्यामागचे दुसरे मुख्य उददिष्ट केंद्र सरकारचे होते.
प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत केंद्र शासन तीन प्रकारचे कर्ज देते .
1) शिशु लोन : शिशु लोन ही एक अशी कर्ज योजना आहे शिशुंसाठी तयार करण्यात आली आहे.जिच्यादवारे आपल्याला 50 हजारापर्यत कर्ज उपलब्ध करून दिले जात असते.
2) किशोर लोन : किशोर लोन ही एक अशी कर्ज योजना आहे जी किशोरवयीनांसाठी चालु करण्यात आलेली आहे.जिच्यादवारे आपल्याला 50 हजारापासुन ते 5 लाखापर्यतचे कर्ज प्राप्त होऊ शकते.
3) तरुण लोन : तरुण लोन ही एक अशी कर्ज योजना आहे तरूणांसाठी सुरु करण्यात आली आहे. जिच्यादवारे प्रत्येक तरुण तरुणीला 5 लाखापासुन ते 10 लाखांपर्यतचे कर्ज उपलब्ध करून दिले जाते.
1) मायक्रो फायनान्स इन्स्टीटयुट
2) नाँन बँकिंग फायनान्स इन्टिटयुट
या दोघांपैकी कोणाकडुनही आपण मुद्रा योजने अंतर्गत लोन साठी अर्ज करून लोन प्राप्त करू शकतो.
प्रधानमंत्री मुद्रा योजने अंतर्गत जेव्हा आपण लोन काढत असतो. तेव्हा आपल्याला देखील थोडेफार पैशांचे योगदान देणे गरजेचे असते. पण हे सर्वस्वी अवलंबुन असते कि आपण कोणत्या बँकेदवारे लोनसाठी अर्ज करतो. पण शिशु लोन नावाची जी कर्ज योजना आहे. त्यासाठी सहसा कोणतीही बंँक योगदान मागत नसते.
प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत आपण जे लोन घेत असतो. त्याचे व्याजदर आपण ठरवु शकत नसतो. त्या लोनवर आपल्याला किती व्याजदर द्यावे लागेल हे ती संस्थाच ठरवत असते जिच्यादवारे आपण कर्ज काढत असतो. असे प्रधानमंत्री मुद्रा योजना माहिती घेताना समजते.
प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत प्राप्त होत असलेल्या कर्जासाठी आपल्याला कुठल्याही प्रकारची सिक्युरीटी देण्याची आवश्यकता पडत नाही. असे खुद्द केंद्र सरकारने ही योजना चालू करताना जाहीर केले आहे. कारण सीडबी द्वारे स्थापण केलेली मुद्रा संस्था ही आपल्या कर्जाची पुर्ण गँरंटी घेत असते. म्हणुन आपल्याला कोणतीही सिक्युरीटी देण्याची अजिबात आवश्यकता नसते.
● पँनकार्ड
● आधार कार्ड
● रहिवासी दाखला
● जातीचा दाखला
● शाँप अँक्ट लायसन किंवा उद्योग आधार
● इलेक्ट्रीसीटी बील ( व्यवसाय ठिकाणाचे)
● आधी कोणतेही कर्ज घेतलेले नसावे.
● मागील सहा महिन्याचे अकाऊंट स्टेटमेंट
● मागच्या दोन महिन्याचे बँलन्स शीट, भरलेला इन्कम टँक्स
● प्रोजेक्ट बँलन्स शीट
● प्रोजेक्ट रिपोर्ट
● कर्जासाठी अर्ज करण्याअगोदर आपण याअगोदर किती माल विकला त्याचे प्रमाण कागदपत्र
● मशिनरी कोटेशन इत्यादी
या पेक्षा अधिक कागदपत्रे लागण्याची दाट शक्यता असते. आपण जो उद्योग व्यवसाय सुरु करत असाल त्यानुसार आपण त्या कागदपत्रांची देखील पुर्तता करणे खुप गरजेचे आहे. प्रधानमंत्री मुद्रा योजना माहिती आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा.
संबंधित लेख
अमेझॉन वर प्रत्येक वर्षाच्या ऑक्टोबर मध्ये येणाऱ्या sale मध्ये वस्तू इतक्या स्वस्त का असतात? असा प्रश्न तुम्हाला पडत असेलच, तसेच या सेल मध्ये वस्तू विकत… Read More
NCB विषयी माहीती मराठी Narcotics Control Bureau ही एक गुप्तचर संस्था आहे जिचे प्रमुख काम हे अवैधपणे होणारी ड्रग्जची तस्करी थांबवणे तसेच त्यावर आळा घालणे… Read More
ऑनलाईन शॉपिंग आज स्मार्ट फोन आणि इंटरनेट आल्यामुळे आपणा सर्वाना कोणत्याही वस्तुची घरबसल्या खरेदी करणे अगदी सोपे झाले आहे. एका क्लीकवर आज आपण हजारो नही… Read More