अर्थकारण

Money Laundering म्हणजे काय?

शेअर करा

Money Laundering म्हणजे काय?

व्यवसाय अथवा वयक्तिक कमाई केलेल्या पैशांवर काही टक्के कर सरकारकडे भरावा लागतो, कर चुकवण्यासाठी चुकीच्या मार्गाने पैशाचे व्यवहार करणे म्हणजे Money Laundering. अनेक व्यापारी कर वाचवण्यासाठी अवैध मार्गाचा अवलंब करतात. आर्थिक गैरव्यवहार थांबवण्यासाठी सरकारने अनेक कायदे, तपास यंत्रणा, टास्क फोर्स स्थापन केल्या आहेत. PMLA कायदा २००२ अंतर्गत ईडी ही तपास यंत्रणा आर्थिक गैरव्यवहाराचा तपास करते. 

भारतामध्ये अनेक प्रकारचे कर भरावे लागतात त्यात व्यापारी असाल तर GST कर भरावा लागतो. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या नियमाप्रमाणे ५ लाखाच्या वर वयक्तिक उत्पन्नावर आयकर भरणे बंधनकारक आहे. तसेच व्यापारी वर्गासाठी २० लाखांच्या वर उलाढाल असेल तर जीएसटी कर भरावा लागतो. १८% इतका जीएसटी कर व्यापाऱ्यांना भरावा लागतो. हा कर वाचवण्यासाठी व्यापारी Money Laundering या पद्धतीच्या वापर करतात. 

काळा पैसा

शब्दशः अर्थ घेतला तर जसे आपण कपडे धुतो (cloth laundering) तसेच पैसे धुणे/स्वच्छ करणे.Money Laundering म्हणजे काळे पैसे पांढरे करणे. या मध्ये कर बुडवणे हा एकमेव उद्देश असतो असे नाही. दहशदवादी संघटना एका देशातून दुसऱ्या देशात पैसे पाठ्वण्यासाठी देखील याचा वापर केला जातो. हवाला द्वारे पैशांचे व्यवहार केले जातात, ज्यामुळे कुठेच पकडले जाऊ शकत नाहीत. 

कर वाचवण्यासाठी जास्तीत जास्त रोख रकमेने व्यवहार केला जातो. कारण बँकेच्या खात्यावर केल्या जाणाऱ्या व्यवहारांवर बँकेची नजर असते. मात्र रोख रकमेने केलेला व्यवहार कुठेही नोंदवलेला नसतो, त्यामुळे अशा व्यवहाराचा लवकर शोध लागत नाही. अशाप्रकारचा काळा पैसा पांढरा करण्यासाठी विविध कंपन्यांची स्थापना केली जाते जी फक्त कागदोपत्री असते आणि त्यामध्ये हा पैसे गुंतवला जातो. काही काळाने कंपनी तोट्यात गेली असे दर्शवून कंपनी बंद केली जाते आणि त्यातील सर्व पैसा काढून घेतला/हस्तांतरित केला जातो. 

हवाला म्हणजे काय?

जसे नकली कंपन्या स्थापित करून कर बुडवला जातो तसे अनेक मार्ग आहेत. त्यापैकी अजून एक मार्ग म्हणजे हवाला पद्धत. जर एखाद्या व्यापाऱ्याला मुंबईतून दिल्लीच्या व्यापाऱ्याला पैसे पाठवायचे आहेत परंतु बँकेचा वापर टाळायचा आहे. त्यावेळेस हवाला मार्गाने पैसे पाठवले जातात. मुंबई मधला व्यापारी मुंबई मधेच असणाऱ्या दलालाकडे पैसे देतात. हे पैसे दिल्लीतला दलाल तेथील व्यापाऱ्याकडे पोचवतो या बदल्यात काही टक्के रक्कम कमिशन स्वरूपात घेतली जाते. हा सर्व व्यवहार रोख रकमेच्या माध्यमातून होतो त्यामुळे कुठलाच कर लागत नाही. 

Enforcement Directorate (ED) ही तपास यंत्रणा अशा सर्व अवैध मार्गाने आणलेल्या पैशाचा, संपत्तीचा तपास करते. Prevention of Money Laundering Act, 2002 या कायद्यानुसार सर्व कार्यवाही केली जाते. अवैध मार्गाने व्यवहार करणे हे फक्त कर बुडण्यासाठी नाही तर देखाच्या सुरक्षेसाठी देखील घातक आहे. अनेक दहशदवादी याचा वापर करून कारवाया करू शकतात. त्यामुळे असे अवैध व्यवहार रोखणे महत्वाचे असते.

“Money Laundering म्हणजे काय?” या पोस्ट बद्दल आपल्या प्रतिक्रिया खालील चौकटीत नोंदवा.


रोहित श्रीकांत
Share
Published by
रोहित श्रीकांत

Recent Posts

Amazon Great Indian Festival मध्ये वस्तू इतक्या स्वस्त का असतात? Sale मध्ये कोणकोणत्या गोष्टी विकत घेतल्या पाहिजेत?

अमेझॉन वर प्रत्येक वर्षाच्या ऑक्टोबर मध्ये येणाऱ्या sale मध्ये वस्तू इतक्या स्वस्त का असतात? असा प्रश्न तुम्हाला पडत असेलच, तसेच या सेल मध्ये वस्तू विकत… Read More

2 years ago

NCB विषयी माहीती

NCB विषयी माहीती मराठी Narcotics Control Bureau ही एक गुप्तचर संस्था आहे जिचे प्रमुख काम हे अवैधपणे  होणारी ड्रग्जची तस्करी थांबवणे तसेच त्यावर आळा घालणे… Read More

4 years ago

ऑनलाईन शॉपिंग करताना कोणती काळजी घ्यावी?

ऑनलाईन शॉपिंग आज स्मार्ट फोन आणि इंटरनेट आल्यामुळे आपणा सर्वाना कोणत्याही वस्तुची घरबसल्या खरेदी करणे अगदी सोपे झाले आहे. एका क्लीकवर आज आपण हजारो नही… Read More

4 years ago