सरकारी नोकरीच्या फसव्या जाहिरातीची अनेक प्रकरणे समोर येत असतात. वाढत्या स्पर्धेमुळे नोकरी अतिशय जिव्हाळ्याचा विषय बनलाय. त्यातल्या त्यात सरकारी नोकरी मिळवण्याचं प्रत्येकाचंच एक स्वप्न असतं. आपला शोध सुरु असतोच. मात्र सद्यस्थितीत सरकारी नोकरी मिळवणं हे काही सोपं काम राहिलेलं नाही. याच संधीचा फायदा घेत काही जण बेरोजगार तरुणांना हेरून त्यांना सरकारी नोकऱ्यांचं आमिष दाखवल जात.
नोकरीसाठी प्रयत्न करत असलेले कित्येकजण या फसव्या जाहिरातींना बळी पडतात. यामुळे आर्थिक नुकसान किंवा मग पश्चाताप होण्याची दाट शक्यता असते. जर तुम्ही देखील सरकारी नोकरीसाठीच्या जाहिराती पाहत असाल तर ती जाहिरात खरी आहे की खोटी? हे ओळखण्यासाठी खालील काही गोष्टी नक्की लक्षात ठेवा…
एखादी नोकरी प्रत्यक्ष किंवा घोटाळा असेल तर आपण कधीही विचार केला आहे का? सरकारी नोकरीच्या फसव्या जाहिराती आणि खऱ्या जाहिराती, काहीवेळा फरक सांगणे कठीण होऊ शकते. बनावट नौकरी ऑफर ओळखण्यास आणि जॉब स्कॅम्स टाळण्यासाठी येथे काही टिपा आहेत.
१) सरकारी नोकऱ्यांसाठी साधारण वयोमर्यादा ही ३० ते ४० वर्षे इतकी असते. मात्र फसव्या जाहिरातीमध्ये ही वयोमर्यादा वाढवून ४० च्या वर सांगितली जाते.
२) आपण त्यांच्याशी संपर्क साधला नाही, त्यांनी आपल्याशी संपर्क साधला– ते म्हणतील की त्यांना आपले रेझ्युमे ऑनलाइन सापडले आहे. अश्या वेळेस त्याच्यावर लगेच विश्वास ठेऊ नका, त्यांना नौकरीची व त्यांची संपूर्ण माहिती विचारा.
३) ई-मेल मध्ये संपर्क माहिती समाविष्ट करीत नाहीत किंवा ई-मेल वैयक्तिक खात्यावरून पाठवले जात नाहीत.
तर खरा व खोटा ई-मेल कसा ओळखाल? खरा ई-मेल असा असतो – jobs@xyz.com आणि खोटा ई-मेल असा असतो- jobs@xyz-abc-pqr.com
४) बहुदा फसव्या जाहिरातीमध्ये नोकरी भरतीसाठीच्या पदांची संख्या ही वाढवून २५००० दाखवली जाते. जास्तीत जास्त लोक या फसव्या जाहिरातीच्या जाळ्यात अडकावेत म्हणून ही पदांची संख्या वाढवलेली असते.
५) बहुदा फसव्या जाहिरातीमध्ये शैक्षणिक पात्रता ही कमी असते. म्हणजेच ८वी पास, १०वी पास उमेदवारांसाठी संधी असल्याचे दाखवले जाते.
६) जाहिरातीमध्ये ज्या विभागातील रिक्त पदांचा उल्लेख केला असेल. त्याच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ही माहिती खरी आहे का? हे तपासा. उदा. MPSC चे अधिकृत संकेतस्थळ https://mpsc.gov.in/ हे आहे.
७) सरकारी विभागांच्या संकेतस्थळाच्या शेवटी .nic.in किंवा .gov.in असतं. मात्र फसव्या जाहिरातीमध्ये अशा कुठल्याच गोष्टीचा उल्लेख नसतो.
८) ते म्हणतात की ते आपल्याला पैसे किंवा मौल्यवान वस्तू पाठवू शकतात किंवा ते निधी हस्तांतरित करण्यासाठी आपले वैयक्तिक बँक खाते वापरू इच्छित आहेत असा वेळेस त्यांना आपली माहिती देऊ नका.
९) वैयक्तिक माहिती ऑनलाईन प्रविष्ट करण्यापूर्वी, संकेतस्थळाच्या पत्ता बारवर पाहून वेबसाइट सुरक्षित असल्याचे सुनिश्चित करण्यासाठी पत्ता तपासा. https: // म्हणजेच सुरक्षित आणि http: // सुरक्षित नाही.
१०) अस्पष्ट नोकरी आवश्यकता आणि नोकरी वर्णन – स्कॅमर्सना त्यांचे ईमेल जॉबच्या गरजांची सूची करून विश्वसनीय बनविण्याचा प्रयत्न करतात.सहसा, या आवश्यकता इतक्या हास्यास्पदरीत्या सोपी असतात की जवळजवळ प्रत्येकजण पात्र ठरतो: १८ वर्षे वयाचे असणे आवश्यक आहे, भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे, इंटरनेटची ओळख असणे आवश्यक आहे.
सरकारी नोकरीच्या फसव्या जाहिराती कश्या ओळखायच्या हे आपल्याला समजले असेल. जाहिरातींना बळी न पडता प्रामाणिकपणे प्रयत्न करून, जिद्दीने अभ्यास करून पात्रता सिद्ध होते, हे लक्षात घेतले पाहिजे. सहजासहजी सरकारी नोकरी मिळत नाही त्यासाठी कशी घ्यावे लागतात.
संबंधित लेख
अमेझॉन वर प्रत्येक वर्षाच्या ऑक्टोबर मध्ये येणाऱ्या sale मध्ये वस्तू इतक्या स्वस्त का असतात? असा प्रश्न तुम्हाला पडत असेलच, तसेच या सेल मध्ये वस्तू विकत… Read More
NCB विषयी माहीती मराठी Narcotics Control Bureau ही एक गुप्तचर संस्था आहे जिचे प्रमुख काम हे अवैधपणे होणारी ड्रग्जची तस्करी थांबवणे तसेच त्यावर आळा घालणे… Read More
ऑनलाईन शॉपिंग आज स्मार्ट फोन आणि इंटरनेट आल्यामुळे आपणा सर्वाना कोणत्याही वस्तुची घरबसल्या खरेदी करणे अगदी सोपे झाले आहे. एका क्लीकवर आज आपण हजारो नही… Read More