Commerce म्हणजे व्यापार/व्यवसाय आणि ई कॉमर्स म्हणजे इंटरनेटच्या माध्यमातून वस्तू व सेवांची विक्री करणे. बाजारामध्ये जाऊन थेट वस्तू खरेदी/विक्री करणे म्हणजे “व्यापार”, ही पारंपरिक पद्धत आहे. तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे व्यवसाय देखील ऑनलाईन होत आहे. इंटरनेटच्या माध्यमातून स्वतःचा व्यवसाय करणे म्हणजेच E-commerce Business करणे होय.
दैनंदिन वापरातील वस्तू स्थानिक बाजारपेठेतून खरेदी केल्या जातात. जसे भाजी, फळे, किराणा आणि इतर वस्तू जवळच्या दुकानात सहज उपलब्ध होतात. दैनंदिन आणि आवश्यक वस्तू शिवाय इतर वस्तू, जसे कपडे, पादत्राणे, उपकरणे इत्यादी वस्तू सर्वात आधी E-commerce वरती उपलब्ध केल्या गेल्या. या वस्तू कमी आवश्यक असल्याने थोड्या उशिरा मिळाल्या तरी चालतात, शिवाय जास्तीत जास्त पर्याय उपलब्ध असतात. (E Commerce information in Marathi).
भारतात Amazon, Flipkart या कंपन्या ओनलाईन वस्तू विक्रीसाठी अग्रेसर आहेत. येथून जर एखादी वस्तू मागवली तर चार ते पाच दिवसात तुमच्या घरापर्यंत येते. वस्तू पोचल्यानंतर पैसे देण्याचा पर्याय देखील यांनी उपलब्ध करून दिला. यानंतर भारतामध्ये E-commerce व्यवसाय वाढू लागला आणि स्थानिक व्यवसायांचे महत्व कमी झाले.
एखादी वस्तू खरेदी करायची असेल तर आपल्याला घराबाहेर पडून बाजारात जाऊन ती वस्तू घ्यावी लागते. जवळच्या बाजारात उपलब्ध नसेल तर थोडे दूर जावे लागेल. परंतु ई कॉमर्स व्यवसायामुळे घरबसल्या वस्तू मागवता येतात. बाजारापेक्षा कमी किमतीत उत्तम दर्जाच्या वस्तू घरापर्यंत पोहचतात, म्हणजेच वस्तूंच्या किमतीच्या काही टक्के प्रमाणात डिस्काउंट दिला जातो.
जर आपण स्थानिक बाजारपेठांमध्ये जाऊन वस्तू खरेदी करत आहेत तर तिथे जास्तीत जास्त रोख रकमेचा वापर केला जातो. ऑनलाईन सेवा उपलब्ध असून देखील व्यापारी अधिक कर लागू नये या कारणाने “कॅश” हा पर्याय देतात. ऑनलाईन वस्तू मागवताना व्यवहार/ रक्कम देखील ऑनलाईन देण्याचा पर्याय असतो. काही मोजक्या वस्तू प्रकारात कॅश व डिलिव्हरी चा पर्याय दिला जातो.
ई कॉमर्स वेबसाईट वरून वस्तू मागवल्या तर ३ ते ४ दिवसात लगेच घरपोच मिळतात. वस्तू साठी दूरच्या बाजारपेठेत जाण्याचे कष्ट वाचतात. तसेच दुचाकी अथवा चारचाकी प्रवासाचे पैसे देखील वाचतात. Amazon Prime सारख्या सेवा एका दिवसात वस्तू घरपोच देतात.
ई कॉमर्स वेबसाईट वर एका वासू साठी असंख्य पर्याय उपलब्ध असतात, जवळच्या बाजारात काही मोजकेच पर्याय उपलब्ध असतात. बऱ्याच वेळा स्थानिक बाजारपेठेत आपल्या गरजेनुसार वस्तू मिळत नाहीत. अशा वेळेस ऑनलाईन वस्तू मागवणे हा पर्याय उपयुक्त ठरतो. जिथे आपल्याला जशी वस्तू हवी आहे तशी निवडता येते आणि कमी किमतीत घरपोच वस्तू आणता येते.
तंत्रज्ञान आणि ई कॉमर्स चे फायदे अनेक असले तरी स्थानिक व्यापाऱ्यांना यामुळे नुकसान होत आहे. गरजेच्या वस्तू देखील ऑनलाईन उपलब्ध झाल्याने व्यापारी आहेत. वर्षानुवर्षे होत आलेला व्यापार कमी होत चालला आहे. त्यामुळे जवळच्या बाजारपेठेत वस्तू उपलब्ध असेल तर तेथूनच त्या खरेदी करायला हव्यात. जेणेकरून स्थानिक व्यापाऱ्यांना नुकसान होणार नाही. ज्या वस्तू उपलब्ध नाहीत त्या ऑनलाईन मागवू शकतो. (E Commerce information in Marathi).
संबंधित लेख
अमेझॉन वर प्रत्येक वर्षाच्या ऑक्टोबर मध्ये येणाऱ्या sale मध्ये वस्तू इतक्या स्वस्त का असतात? असा प्रश्न तुम्हाला पडत असेलच, तसेच या सेल मध्ये वस्तू विकत… Read More
NCB विषयी माहीती मराठी Narcotics Control Bureau ही एक गुप्तचर संस्था आहे जिचे प्रमुख काम हे अवैधपणे होणारी ड्रग्जची तस्करी थांबवणे तसेच त्यावर आळा घालणे… Read More
ऑनलाईन शॉपिंग आज स्मार्ट फोन आणि इंटरनेट आल्यामुळे आपणा सर्वाना कोणत्याही वस्तुची घरबसल्या खरेदी करणे अगदी सोपे झाले आहे. एका क्लीकवर आज आपण हजारो नही… Read More