Dr. APJ Abdul Kalam Information in Marathi
डाँ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना आपण सर्वजण मिसाईल मॅन तसेच माजी राष्ट्रपती म्हणुन ओळखतो. एवढेच नव्हे तर डाँ. अब्दुल कलाम हे एक वैज्ञानिक तसेच अभियंता म्हणुन देखील ओळखले जातात. अब्दुल कलाम यांचे प्रेरणादायी विचार आज देखील आपल्या तरूण पिढीला प्रेरित करण्याचे काम करतात. आज आपण ह्याच महान व्यक्तीमत्वाची अब्दुल कलाम यांच्याबद्दल सविस्तर माहिती जाणुन घेणार आहोत.
अब्दुल कलाम यांचा जन्म, बालपण, कुटुंब
डाँ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे संपुर्ण नाव अबुल पाकिर जैनुलुद्दिन अब्दुल कलाम असे आहे. डाँ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्म 15 आँक्टोंबर 1931 रोजी तामिळनाडुतील रामेश्वरम नावाच्या छोटयाशा गावी झाला होता. अब्दुल कलाम यांच्या वडीलांचे नाव जैनुलुदद्दीन असे आहे. आणि त्यांच्या आईचे नाव अशी अम्मा असे आहे. त्यांना एकुण चार भाऊ आहेत. तसेच एक बहिण सुद्धा आहे.
अब्दुल कलाम यांचे प्राथमिक, महाविद्यालयीन शिक्षण
डाँ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे प्राथमिक शिक्षण हे त्यांच्या रामेश्वरम ह्या गावी असलेल्या शाळेतुन झाले. त्यानंतर त्यांनी त्यांचे पुढचे शिक्षण हे रामनाथपुरम येथील हायस्कुलमध्ये घेतले. मग यानंतरही पुढे शिक्षण घेण्याचा निर्णय अब्दुल कलाम यांनी घेत तिरुचिरापल्ली येथे सेंट जोसेफ महाविद्यालयात बीएससी साठी प्रवेश घेतला. पण बीएससी पुर्ण केल्यानंतर त्यांना जे स्वप्र पुर्ण करायचे आहे ते येथे पुर्ण होणार नाही, म्हणुन अब्दुल कलाम यांनी अभियांत्रिकीचे शिक्षण घेण्याचे ठरवले. त्यासाठी मग त्यांनी मद्रास टेक्नाँलाँजी इंस्टीट्युट मध्ये प्रवेश घेत अभियांत्रिकेचे शिक्षण देखील पुर्ण केले.
त्यानंतर त्यांनी इंजिनिअरींगचे पहिले वर्ष पुर्ण होताच अँराँनाँटिकल इंजिनिअरींग हा विषय दितीय वर्षापासुन स्पेशल म्हणुन घेतला. मग पदवीचे शिक्षण पुर्ण करून झाल्यावर ते बंगलोर येथील हिंदुस्तान अँरोनाँटिक्स लिमिटेड ह्या वैमानिक कंपनीत विमानाची देखरेख करण्याचे कार्य करु लागले. त्याचदरम्यान त्यांनी सर्व प्रकारच्या इंजिनवर काम केले आणि त्याचे योग्य ते प्रक्षिक्षण देखील घेतले. काही कालांतराने त्यांनी वैज्ञानिक क्षेत्रात मिसाईल मॅन म्हणुन आपली एक वेगळी ओळख देखील निर्माण केली.
अब्दुल कलाम यांनी केलेला शैक्षणिक संघर्ष :
डाँ. ए. पी. जे. अब्दुल कलाम हे लहान असतानाच त्यांचे वडिल वारले त्यामुळे घरात आर्थिक हातभार लावण्यासाठी त्यांनी वर्तमानपत्र विकण्याचे घरोघरी पेपर टाकण्याचे तसेच इतर छोट मोठी कामे देखील केली. जेव्हा अब्दुल कलाम यांनी बी एससीसाठी प्रवेश घ्यायचे ठरवले होते तेव्हा तेथील प्रवेश फी भरायला देखील त्यांच्याकडे पैसे नव्हते. तेव्हा त्यांची प्रवेश फी भरण्यासाठी त्यांच्या बहिणीने आपले दागिणे गहाण ठेवुन त्यांची प्रवेश फी भरण्यासाठी पैशांची व्यवस्था केली होती.
अब्दुल कलाम यांचा राजकीय प्रवास :
२००२ मध्ये जी निवडणुक झाली होती त्या निवडणुकीत अब्दुल कलाम हे राष्ट्रपती म्हणुन निवडुन आले होते. राष्ट्रपती म्हणुन निवडुन येणारे पहिले वैज्ञानिक ते होते. पाच वर्ष अब्दुल कलाम यांनी राष्ट्रपतीपदाची धुरा सांभाळली होती. ह्या काळात त्यांनी लोकांची मने आणि त्यांचे प्रेम जिंकुन घेतले होते. कारण सामान्य जनतेला ते स्वताहुन भेटायला जायचे त्यांच्या समस्या जाणुन घ्यायचे आणि त्याचे निवारण करण्याचे काम देखील ते करायचे.
राजकारणाचा कोणताही घरगुती वारसा तसेच वैयक्तिक अनुभव नसताना देखील त्यांनी आपली जबाबदारी चोखपणे पार पाडली. राजकारणात असताना त्यांनी अनेक बिकट परिस्थितींचा सामना केला. अनेक महत्वपुर्ण तसेच निर्णायक निर्णय देखील घेतले.
अब्दुल कलाम यांची लेखनसंपदा
डाँ अब्दुल कलाम यांनी शैक्षणिक, वैज्ञानिक, राजकीय क्षेत्राबरोबरच लेखन क्षेत्रात देखील आपले बहुमुल्य योगदान दिलेले आहे. त्यांनी लिहिलेली काही महत्वाची ग्रंथ पुढीलप्रमाणे आहेत:
१) अदम्य जिद्द
२) इग्नाईटेड माईंड : अनशिलिंग पावर विदिन इन इंडिया
३) इंडिया २०२० : व्हिजन फाँर द न्यु मिलनियम
४) इंडिया माय ड्रीम
५) इन व्हिजन अँण्ड इम पाँवर्ड नेशन फाँर सोसायटल ट्रान्सफाँरमेशन
७) टर्निंग पाँईंट
८) दिपस्तंभ
अब्दुल कलाम यांना प्राप्त झालेले पुरस्कार
१) १९९७ मध्ये भारतरत्न
२) १९९१ मध्ये पद्मभुषण
३) १९८२ मध्ये डाँक्टर पदवी
४) १९९० मध्ये पद्मविभुषण
५) १९९७ मध्ये राष्टीय एकता इंदिरा गांधी पुरस्कार
डाँ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा स्वभाव
डाँ. ए. पी. जे अब्दुल कलाम यांचा स्वभाव हा संवेदनशील होता. त्यांना लहान मुलांशी गप्पा मारायला खुप आवडायचे. आणि त्यांना विज्ञानाची खुप आवड होती. अब्दुल कलाम हे एक विज्ञानप्रेमी होते.
डाँ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे प्रेरणादायी विचार
● जेव्हा पावसाची सुरूवात होत असते तेव्हा सर्व पक्षी घरटयात आश्रय घेत असतात. मात्र अशा वेळी गरूड हा पावसापासुन स्वताला वाचवायला ढगांच्या वरून उडत असतो.
● देशात सर्वाधिक बुदधीमत्ता असलेले व्यक्ती हे वर्गात शेवटच्या बाकावरच बसताना दिसुन येतात.
● यश मिळविण्याबाबतची आपली निष्ठा जर कणखर असेल तर आपल्याला अपयशामुळे कधीच नैराश्य येत नसते.
● पहिले यश प्राप्त झाल्यानंतर कधीच बसुन राहु नका नाहीतर पुढच्या वेळी अपयशी झाले तर जगाला वाटेल की तुमचे पहिले यश हे तुम्हाला नशिबाने मिळाले होते.
● स्वप्र जर पुर्ण करायचे असेल तर आधी स्वप्रे पाहायला शिका.
डाँ. ए. पी. जे अब्दुल कलाम यांचा मृत्यु
२७ जुलै २०१५ ह्या दिवशी संध्याकाळच्या वेळेस राहण्यायोग्य ग्रह ह्या विषयावर अब्दुल कलाम इंस्टीटयुट आँफ शिलाँग येथे व्याख्यान देत असताना त्यांना अचानक हदयविकाराचा झटका आला आणि ते खाली कोसळुन पडले. त्यानंतर त्यांना तात्काळ उपचारासाठी दवाखान्यात नेण्यात आले. तेथे बेथानी नावाच्या हाँस्पिटलमध्ये आयसीयु मध्ये ठेवण्यात आले होते. तिथेच काही तासांनंतर त्यांचे निधन झाले होते.
अशा पद्धतीने २७ जुलै २०१५ रोजी संध्याकाळच्या वेळेस व्यासपीठावर व्याख्यान देत असताना अचानक हदय विकाराचा झटका आल्याने एक महान वैज्ञानिक, देशाचे राष्ट्रपती, अभियंता, तसेच लेखक आपणा सर्वाना सोडुन कायमचे काळाच्या पडद्याआड निघून गेले. अब्दुल कलाम यांनी देशाच्या विकासात खुप मोलाची भुमिका पार पाडली होती. म्हणुन आज सुद्धा त्यांना जनता अभिमानाने आणि प्रेमाने स्मरण करताना आपणास दिसुन येते.