तंत्रज्ञान

आपल्या वेबसाईट ची ट्रॅफिक वाढवण्यासाठी ५ सोपे मार्ग

शेअर करा

वेबसाईट ट्रॅफिक

आपल्या संकेतस्थळावर जास्तीत जास्त लोकांनी भेटी द्याव्या या साठी प्रत्येकजण खूप कष्ट घेत असतो. सुरुवातीच्या काळात आपल्या वेबसाईट वर जास्त ट्रॅफिक येत नाही, पण जर आपण सतत प्रयत्न केले तर ट्रॅफिक वाढत जाईल. वेबसाईट वर ट्रॅफिक आणण्यासाठी असंख्य मार्ग उपलब्ध आहेत, या पैकी एसइओ, सोशल मीडिया, जाहिरात हे सर्वांना माहित आहेत. या व्यतिरिक्त पाच असे पर्याय आहेत, ज्याचा वापर करून तुम्ही ट्रॅफिक वाढवू शकता.

१. फेसबुक (Facebook)

स्वतःच्या फेंसबूक प्रोफाइल वर आपल्या वेबसाईट बद्दल पोस्ट करणे हे बऱ्याच लोकांना आवडत/पटत नाही , बरेच लोक आपली वेबसाईट आणि वयक्तिक ओळख खाजगी ठेऊ इच्छितात. त्यासाठी वेबसाईट च्या नावाने पेज बनवणे आणि त्यावर पोस्ट करणे हा उत्तम पर्याय आहे. पेज लाईक वाढवण्यासाठी आपल्या मित्रांना लाईक करण्यासाठी आमंत्रित करा. 

फेसबुक मध्ये अजून एक पर्याय आहे तो म्हणजे ग्रुप बनवणे. आपली वेबसाईट ज्या विषयाशी निगडित आहे त्या प्रकारची माहिती या ग्रुप वर टाकली जाऊ शकते. ज्या लोकांना यात रस आहे असे लोक आपोआप जोडले जाऊ शकतात. तसेच आपण त्यांना ग्रुप चा सदस्य होण्यासाठी आमंत्रित देखील करू शकता. आपल्या वेबसाईट अथवा किंवा पोस्ट ची लिंक ग्रुप मध्ये टाकली तर येथून वेबसाईट ट्रॅफिक येईल.  तसेच ग्रुप जॉईन करताना सदस्याचा ई-मेल आयडी घ्यावा, जेणेकरून त्यांना नवीन पोस्ट बद्दल माहिती पाठवता येईल.

२. कोरा (Quora

quora.com हा एक असा मंच आहे जेथे लोक प्रश्न विचारतात आणि उत्तर माहित असलेले लोक त्याला उत्तर देतात. म्हणजेच एखाद्या व्यक्तीने विशिष्ठ विषयावर प्रश्न विचारला तर त्या विषयाचे ज्ञान असलेले लोक त्याचे उत्तर देतील. Quora हा मंच मोफत आणि सर्वांसाठी खुला आहे, ई-मेल ने लॉगिन करून कोणालाही सदस्यत्व घेता येते.

Quora वरून आपल्या वेबसाईट ची  ट्रॅफिक कशी वाढवावी? ज्या विषयसंबंधी आपली वेबसाईट आहे त्याच्याशी निगडित अनेक प्रश्न येथे विचारले आहेत. अशा प्रश्नाचे उत्तर लिहून त्या उत्तरामध्ये आपल्या वेबसाईट ची लिंक द्यावी. आपण दिलेले उत्तर समाधान कारक असेल तर जास्त वेळा पहिले जाईल आणि त्या प्रमाणात लिंक वरून ट्रॅफिक देखील येईल.


३. बॅकलिंक (Backlink)

वेबसाईट ट्रॅफिक वाढवण्यासाठी बॅकलिंक हा एक उत्तम पर्याय आहे. बॅकलिंक म्हणजे एखाद्या दुसऱ्या वेबसाईट वर आपल्या वेबसाईट ची लिंक असणे. आपल्या विषयाशी संलग्न अशा अनेक वेबसाईट असतील ज्या प्रसिद्ध आहेत आणि त्यावर चांगली ट्रॅफिक आहे. अशा वेबसाईट ला संपर्क करून त्यांना बॅकलिंक साठी विनंती करू शकतो. 

बॅकलिंक साठी विनंती करताना त्यांना एखाद्या विषयावर ब्लॉग लिहून देऊ शकता, ज्या ब्लॉग मध्ये बॅक लिंक टाकलेली असेल. म्हणजेच त्यांना कन्टेन्ट मिळेल आणि आपल्याला बॅकलिंक. या साठी आपल्याला पैशाची मागणी होऊ शकते जी अगदी रास्त आहे. कारण तिथपर्यंत पोहचण्यासाठी अपार कष्ट केलेले आहेत. व्यवस्तीत संवाद  साधला तर कमी खर्चात चांगली backlink मिळू शकते.

४. पुश नोटिफिकेशन (Push Notifications)

 

वेबसाईट वर येणाऱ्या प्रत्येकाला ही सूचना दाखवली जाते, ज्या मध्ये दोन पर्याय असतील “allow” आणि “deny”. जर allow वर क्लीक केले तर पुढे येणाऱ्या सर्व नवीन पोस्ट बद्दल सूचना ब्राऊसर मार्फत दिल्या जातील. त्याच प्रमाणे deny वर क्लीक केले तर सूचना दिल्या जाणार नाहीत. 

Push notifications चा वापर करून मोफत ट्रॅफिक वाढवू शकतो. ज्या लोकांनी allow notification निवडले आहे त्यांना पुढील सर्व पोस्ट बद्दल सूचना पाठवली जाईल. म्हणजेच ज्यांनी आपल्या वेबसाईट आधी भेट दिली आहे त्यांना परत आणणे. One Signal ही पुश नोटिफिकेशन सेवा देणारी कंपनी आहे तिथून आपल्या वेबसाईट साठी ही सेवा चालू करू शकता.

 ५. ई-मेल मार्केटिंग (Email Marketing)

सर्व प्रकारच्या वेबसाईट ला ट्रॅफिक वाढवण्यासाठी ई-मेल आयडी यादी असणे आवश्यक असते. जे लोक आपले ब्लॉग वाचतात त्यांचे ई-मेल आयडी घेणे आणि त्याद्वारे जाहिरात करणे म्हणजेच ई-मेल मार्केटिंग होय. वेबसाईट वर असलेली माहिती जर उपयुक्त असेल तर वाचक सहज ई-मेल आयडी देतील. 

यादी तयार होण्यास वेळ लागतो पण थोड्या दिवसात चांगला वाचक वर्ग तयार होईल आणि आपोआप जास्त भेटी येतील. महत्वाची बाब म्हणजे जो ई-मेल तुम्ही पाठवणार असाल त्यात कमीत कमी ओळी लिहाव्यात आणि सविस्तर माहितीसाठी लिंक द्यावी.

आज काम सुरू केले आणि उद्या लगेच ट्रॅफिक वाढेल अशी अपेक्षा करू नका. त्यासाठी सातत्य आणि संयम या गोष्टी महत्वाच्या आहेत.कमीत कमी एक महिना काम केल्यानंतर ट्रॅफिक मध्ये वाढ नक्कीच होईल. एका नवीन ब्लॉग/वेबसाईट वर दिवसाला ५०० भेटी येण्यासाठी किमान सहा ते आठ महिन्याचा कालावधी जातो. थोडे कष्ट घ्याल आणि वरील गोष्टीत सातत्य ठेवाल तर यश हमखास मिळेल.


वरील लेखाबद्दल आपल्या प्रतिक्रिया खाली दिलेल्या संपर्क कक्षा मध्ये नोंदवू शकता.

रोहित श्रीकांत
Share
Published by
रोहित श्रीकांत

Recent Posts

Amazon Great Indian Festival मध्ये वस्तू इतक्या स्वस्त का असतात? Sale मध्ये कोणकोणत्या गोष्टी विकत घेतल्या पाहिजेत?

अमेझॉन वर प्रत्येक वर्षाच्या ऑक्टोबर मध्ये येणाऱ्या sale मध्ये वस्तू इतक्या स्वस्त का असतात? असा प्रश्न तुम्हाला पडत असेलच, तसेच या सेल मध्ये वस्तू विकत… Read More

2 years ago

NCB विषयी माहीती

NCB विषयी माहीती मराठी Narcotics Control Bureau ही एक गुप्तचर संस्था आहे जिचे प्रमुख काम हे अवैधपणे  होणारी ड्रग्जची तस्करी थांबवणे तसेच त्यावर आळा घालणे… Read More

4 years ago

ऑनलाईन शॉपिंग करताना कोणती काळजी घ्यावी?

ऑनलाईन शॉपिंग आज स्मार्ट फोन आणि इंटरनेट आल्यामुळे आपणा सर्वाना कोणत्याही वस्तुची घरबसल्या खरेदी करणे अगदी सोपे झाले आहे. एका क्लीकवर आज आपण हजारो नही… Read More

4 years ago