आपल्या भारतीय संविधानात संसदेचे दोन सदन आहेत एक लोकसभा आणि दुसरी राज्यसभा.लोकसभेला आपण लोकांचे घर असे संबोधत असतो. कारण यात सर्वसामान्य जनतेचा समावेश असतो आणि राज्यसभेला संसदेचे वरचे गृह असे म्हणतात. आज आपण ह्याच दोन महत्वाच्या विषयावर आजच्या लेखातुन जाणून घेणार आहोत की लोकसभा आणि राज्यसभा म्हणजे काय असते? लोकसभा आणि राज्यसभा फरक. जेणेकरून आपल्याला लोकसभा आणि राज्यसभा म्हणजे नेमकी काय आणि यांच्यात असलेली साम्यता आणि विभिन्नता लक्षात येईल.
संपुर्ण महाराष्टातुन लोकसभेत ४८ खासदार निवडुन दिले जातात. लोकसभेला लोकांचे घर असे संबोधिले जात असते. याच्या सदस्यांची निवड देखील लोकांद्वारेच केली जात असते. लोकसभेमध्ये जास्तीत जास्त 552 सदस्य असतात आणि यांच्यातील 530 सदस्य हे राज्याचे प्रतिनिधित्व करत असतात. ह्यातील 20 सदस्य केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधित्व करत असतात.
लोकसभेचा कार्यकाळ हा पाच वर्ष इतका असतो. लोकसभेमध्ये कोणत्याही एका सदस्याची निवड अध्यक्ष म्हणुन केली जात असते. त्यालाच सभापती असे म्हटले जात असते ज्याला मदत करण्याचे काम उपसभापती हा करत असतो. ज्याची निवड सुदधा लोकसभेद्वारेच केली जात असते.
राज्यसभा हे संसदेचे वरचे गृह म्हणुन ओळखले जाते.महाराष्टातुन राज्यसभेवर १९ सदस्य पाठविले जातात.याची सदस्यांची संख्या 250 इतकी असते. राज्यसभेच्या सदस्यांची निवड ही लोकांद्वारे न करता विविध राज्यांच्या विधानसभेद्वारे केली जात असते. प्रत्येक राज्यातील सदस्यांची एक निश्चित अशी संख्या ठरवली गेलेली असते. ज्यातील 12 जणांची निवड ही कला साहित्य आणि विज्ञान शाखेसाठी राष्टपतीदवारे केली जात असते.
तसेच उपराष्टपती हा राज्यसभेचा अध्यक्ष असतो. उपाध्यक्षाची निवड ही राज्यसभेच्या सदस्यांमध्येच केली जात असते. राज्यसभेच्या कोणत्याही सदस्याची वयोमर्यादा ही 30 वर्षापेक्षा कमी नसावी. तसेच ह्यात प्रत्येक सदस्याचा कार्यकाळ हा किमान 6 वर्ष इतका असतो.
लोकसभा हे सर्वसामान्य जनतेचे सदन असे म्हणतात आणि हे एक कनिष्ठ सदन आहे. राज्यसभा हे एक राज्याची परिषद तसेच कनिष्ठ सदन म्हणुन ओळखले जाते.
वरील मुद्दे लोकसभा आणि राज्यसभा फरक स्पष्ट करतात. संसदेचे दोन्ही सभागृह हे पवित्र मानले जातात. संसदेच्या आत आणि परिसरात अनेक नियम लावले गेले आहेत, जेणेकरून संसद भावनांची पवित्रता बाधित होणार नाही.
संबंधित लेख
अमेझॉन वर प्रत्येक वर्षाच्या ऑक्टोबर मध्ये येणाऱ्या sale मध्ये वस्तू इतक्या स्वस्त का असतात? असा प्रश्न तुम्हाला पडत असेलच, तसेच या सेल मध्ये वस्तू विकत… Read More
NCB विषयी माहीती मराठी Narcotics Control Bureau ही एक गुप्तचर संस्था आहे जिचे प्रमुख काम हे अवैधपणे होणारी ड्रग्जची तस्करी थांबवणे तसेच त्यावर आळा घालणे… Read More
ऑनलाईन शॉपिंग आज स्मार्ट फोन आणि इंटरनेट आल्यामुळे आपणा सर्वाना कोणत्याही वस्तुची घरबसल्या खरेदी करणे अगदी सोपे झाले आहे. एका क्लीकवर आज आपण हजारो नही… Read More