गुळवेललाच संस्कृत भाषेत गुडुची असे देखील संबोधिले जाते. गुळवेलचे शास्त्रीय नाव हे टिनोस्पोरा काँर्डीफोलिया असे आहे. गुळवेल ही एक वेल आहे जी श्रीलंका, भारत, म्यामनार तसेच उष्णकटिबंधीय प्रदेशात आढळते. ह्याच गुळवेलला अमृतवेल म्हणुन देखील ओळखले जाते.
ह्या वनस्पतीमध्ये असलेल्या सत्वांचा वापर हा औषध म्हणुन देखील केला जातो. गुळवेल ह्या पानाचा स्वाद हा तिखट तसेच कडु प्रकारचा असतो. गुळवेलचा वापर वात, पित्त तसेच कफ झाल्यावर ते बरे करण्यासाठी केला जात असतो. आज आपण ह्याच गुळवेलविषयी सविस्तर जाणुन घेणार आहोत.
गुळवेल म्हणजे काय असते? गुळवेलाचे फायदे व नुकसान, गुळवेलचा काढा कसा बनवायचा? आयुर्वेदामध्ये गुळवेलचे महत्व काय आहे? इत्यादी बाबींविषयी आपण आजच्या लेखातुन जाणुन घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
गुळवेल ही एक अशी वेल आहे जिच्यामधील सत्वांचा वापर हा औषधाच्या स्वरूपात देखील केला जात असतो. गुळवेलचा प्रामुख्याने वात, पित्त तसेच कफाच्या समस्या दूर करण्यासाठी केला जात असतो. जाणून घेऊ गुळवेलाचे फायदे व नुकसान ..
● गुळवेल ह्या वनस्पतीमध्ये असलेल्या सत्वांचा वापर हा औषध म्हणुन देखील अनेक आजार बरे करण्यासाठी केला जातो.
● गुळवेल ही एक अशी वनस्पती आहे जी आपल्या शरीरातील पांढऱ्या पेशींची संख्या वाढविण्याचे काम करत असते.
● गुळवेलामुळे आपल्या रोगप्रतिकारशक्तीमध्ये देखील वाढ होत असते. म्हणुन वृदध तसेच लहान मुलांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी गुळवेलाचा वापर केला जातो.
● गुळवेल ही वनस्पती वाताचा, पित्ताचा नाश करते. म्हणुन ह्या वनस्पतीला वातनाशक तसेच पित्तनाशक वनस्पती देखील म्हणतात.
● गुळवेलाचा वापर हा मधुमेह बरा करण्यासाठी देखील केला जातो.
● गुळवेलाच्या पानांचा रस पिल्याने आपले शरीर हे नेहमी निरोगी राहते आणि आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक क्षमता देखील वाढत असते.
● समजा आपल्याला वारंवार ताप येत असेल आणि आपला ताप जात नसेल तर अशावेळी आपण गुळवेलाच्या पानाचे सेवन करायला हवे याने आपल्या शरीरातील ताप लवकर उतरतो.
● गुळवेल ह्या वनस्पतीचा वापर हा मलेरिया तसेच टाँयफाँईटसारखे आजार बरे करण्यासाठी देखील विपुल प्रमाणात केला जात असतो.
● गुळवेलाचा वापर आपण पोटाच्या समस्या दुर करण्यासाठी देखील करू शकतो. गुळवेलामुळे आपले पोट दुखणे थांबते तसेच अपचन देखील होत नाही.
● एखाद्या व्यक्तीला जर दम्याचा आजार असेल तर तो बरा करण्यासाठी देखील गुळवेल खुप फायदेशीर ठरत असते.
● जखम तसेच सुज बरी करण्यासाठी देखील गुळवेलाचा वापर केला जातो. कारण विशेष तज्ञांच्या माहीतीनुसार गुळवेलामध्ये काही असे घटक देखील असतात जे आपली अवयवांची सुज कमी करण्याचे काम करत असतात. म्हणुन गुळवेलाचा वापर हा सुज कमी करण्यासाठी देखील केला जात असतो.
● डोळयांच्या समस्येवर देखील गुळवेल लाभदायक ठरत असते. जर आपले डोळयांना सुज आलेली असेल किंवा डोळेलाल झाले असतील तर अशावेळी आपण गुळवेलाच्या पावडरचा वापर करून आपल्या डोळयांच्या समस्येंपासुन मुक्त होऊ शकतो.
गुळवेलाचा काढा बनवण्यासाठी त्याचे एक पान घ्यायचे अणि त्याच्या बारीक बारीक आकाराच्या चकत्या तयार करायच्या आणि मग त्या स्वच्छ पाण्याने धूवून घ्यायच्या. मग एका पातेल्यात दोन ग्लास पाणी उकळत ठेवावे. त्याच उकळत ठेवलेल्या पाण्यात गुळवेलाच्या चकत्या उकळण्यासाठी टाकाव्या मग ते पाच ते दहा मिनिट उकळु द्यायच्या आणि हा काढा रोज सकाळी उपाशीपोटी घ्यायचा.
गुळवेलाचे जसे आयुर्वैदिक फायदे आहेत. वेगवेगळे आजार बरे करण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो त्याचप्रमाणे गूळवेलाचे काही दुष्परिणाम देखील आहेत जे आपण जाणुन घेणे फार गरजेचे आहे.
● गुळवेलाचे सेवन केल्याने लठठ व्यक्ती देखील बारीक होतो. पण त्याच ठिकाणी एखाद्या खुपच बारीक व्यक्तीने जर याचे सेवन केले तर तो अजुन जास्त बारीक होण्याची दाट शक्यता असते.
● ज्या व्यक्तींना रक्तदाबाची समस्या असेल त्यांनी डाँक्टरांचा सल्ला न घेता गुळवलाचे सेवन करणे त्यांच्यासाठी घातक ठरू शकते.
● गर्भवती स्त्रियांनी गुळवेलाचे सेवन करणे टाळावे कारण गुळवेलाचे सेवन केल्यामुळे त्यांचा रक्तदाब हा कमी होण्याची समस्या तसेच वारंवार लघवी होऊन त्यांच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होण्याची समस्या देखील त्यांना उदभवु शकते.
गुळवेल ही एक औषधी वेल आहे. जिच्यात वेगवेगळे रासायनिक घटक आहेत. जसे की ग्लुकोसाईड, गिलोइमन, ग्लूकोसीन, स्टार्च इत्यादी रासायनिक घटक गुळवेलमध्ये आढळुन येत असतात.
गुळवेलीची पाने ही हदयाच्या आकाराची, हिरव्या रंगाची असते. त्यांच्या एका बाजुला टोक देखील असते. गुळवेलीची साल ही भुरकट रंगाची असते. ती साल काढुन बघितल्यास आतमध्ये हिरव्या रंगाचा भाग दिसतो. त्याचबरोबर गुळवेल जर आपण उभी कापली तर तिचा आतील भाग हा आपल्याला गोलाकार तसेच चक्राकार दिसतो.
अमेझॉन वर प्रत्येक वर्षाच्या ऑक्टोबर मध्ये येणाऱ्या sale मध्ये वस्तू इतक्या स्वस्त का असतात? असा प्रश्न तुम्हाला पडत असेलच, तसेच या सेल मध्ये वस्तू विकत… Read More
NCB विषयी माहीती मराठी Narcotics Control Bureau ही एक गुप्तचर संस्था आहे जिचे प्रमुख काम हे अवैधपणे होणारी ड्रग्जची तस्करी थांबवणे तसेच त्यावर आळा घालणे… Read More
ऑनलाईन शॉपिंग आज स्मार्ट फोन आणि इंटरनेट आल्यामुळे आपणा सर्वाना कोणत्याही वस्तुची घरबसल्या खरेदी करणे अगदी सोपे झाले आहे. एका क्लीकवर आज आपण हजारो नही… Read More