जेव्हा आपण बाहेरून म्हणजेच सायबर कँफेमधुन किंवा एखाद्या मध्यस्थी द्वारे पॅन कार्ड बनवत असतो.तेव्हा आपल्याला तिथे कमीत कमी 200 ते 300 रुपये पॅन कार्ड बनवण्यासाठी द्यावे लागत असतात. शिवाय तिथे पॅन कार्ड बनवण्यासाठी भरपुर कागदपत्रेही लागतात. सोबत पॅन कार्ड बनवण्यासाठी आपली धावपळ देखील होत असते. परंतु आज संगणक आणि तंत्रज्ञानाचे युग आहे.जिथे आपण कोणतेही काम धावपळ न करता एका जागेवर बसुन मोबाईल तसेच इंटरनेटचा वापर करून पुर्ण करू शकतो. अत्यंत कमी कागदपत्रांचा उपयोग करून आणि कमी शुल्क भरून हे सर्व काही आपल्याला करता येते.
शिवाय जेव्हा आपण बाहेरून पॅन कार्ड काढतो तेव्हा ते येण्यासाठी आपल्याला कमीत एक ते दीड महिना वाट बघावी लागत असते.पण तेच पॅन कार्ड जर आपण ऑनलाईन पदधतीने बनविले तर मोजुन दहा ते पंधरा दिवसांच्या कालावधीत आपल्याला आपले पॅनकार्ड हे मिळुन जाते.
आजच्या लेखातुन आपण ह्याच संगणक आणि तंत्रज्ञानाचा वापर करून ऑनलाईन पॅन कार्ड कसे काढायचे हे आपण जाणुन घेणार आहोत.याचसोबत पॅन कार्डविषयीच्या इतरही काही महत्वाच्या बाबी आपण सविस्तरपणे जाणुन घेणार आहोत.
पॅन कार्ड काय असते?
पॅन कार्ड हा एक आपला परमनंट अकाऊंट नंबर असतो.ज्याचा वापर आपण आपल्या दैनंदिन जीवनात आर्थिक देवाण घेवाण तसेच आर्थिक व्यवहार करण्यासाठी प्रामुख्याने करत असतो.
ऑनलाईन पॅन कार्ड कसे काढावे?
● सगळयात पहिले आपल्याला www.pan.utiitsl.com ह्या वेबसाईटवर भेट द्यावी लागेल.
● ह्या वेबसाईटवर प्रवेश केल्यानंतर वेगवेगळे पर्याय दिसतात. ज्यात पहिला पर्याय आहे pan card online service information चा ज्यात जिथे आपल्याला सर्व प्रकारच्या pan card online services विषयी उपयुक्त माहिती प्राप्त होते.
● आपल्यासमोर दुसरा पर्याय असतो apply as indian citizen नावाचा जिथे आपण भारतातुन भारताचे नागरीक म्हणुन services साठी apply करू शकतो.
● आपल्यासमोर तिसरा पर्याय असतो apply as foreign citizen नावाचा ज्यात आपण foreign citizen(परदेशातुन परदेशी नागरीक) म्हणुन देखील apply करू शकतो.
● तसेच आपल्याकडे आधीच एखादे पॅनकार्ड असेल आणि आपल्याला त्यात काही दुरुस्ती करायची असेल तर आपण for change correction in pan card ह्या बटणवर क्लिक करा.
● तसेच पॅन कार्ड पाठवण्याच्या प्रकरणासाठी तसेच ई पॅनविषयी काही अडचण असेल तर e pan download वर क्लिक करावे.
● आपले पॅन कार्ड reprint करण्यासाठी reprint pan card ह्या पर्यायावर क्लिक करावे.
● आपल्याला जर आपल्या पॅनकार्डमधील आपला पत्ता बदलायचा असेल तर आपण facility for address update in pan database ह्या पर्यायावर क्लिक करावे.
● तसेच आपल्याला आपल्या भरलेल्या पॅन कार्डच्या अँप्लीकेशनचे,पॅन कार्डचे स्टेटस जाणुन घेण्यासाठी track pan card ह्या पर्यायावर क्लिक करावे.
● पॅन कार्डसाठी फाँर्म भरण्याची फी एकुण 107 रूपये असते जी आपण फाँर्म भरून झाल्यानंतर देखील नेट बँकिंग,युपी आय,किंवा डेबिट कार्ड इत्यादींपैकी कोणत्याही एका पर्यायाचा आधार घेऊन येथे भरू शकतो.
● पॅन कार्डसाठी जेव्हा आपण अर्ज करत असतो तेव्हा आपल्याला तिथे चार पदधतीने अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध असते.
1) Apply for a new pan card
2) Online pan card application
3) Apply and sign using digital signature aadhar based e sign,aadhar holder apply using kyc option
4) Download blank form for pan card
● वरील पर्यांपैकी जर आपल्याला आधार कार्डच्या आधारे पॅन कार्ड काढायचे असेल तर आपण e kyc या दिलेल्या पर्यायावर क्लिक करायचे असते.त्यानंतर आपल्या समोर एक फाँर्म येतो त्यातील सर्व विचारलेली माहिती व्यवस्थित भरून तो फाँर्म आपण सबमीट करावा.
● तो फाँर्म भरून झाल्यावर सबमीट केल्यानंतर आपण आपले पेमेंट करा, त्यांनतर आपल्याला एक पावती मिलेल. ती आपण डाऊनलोड करा कारण त्यात आपला acknowledgement number दिलेला असतो.
● आयडेंटीटी प्रुफ :
आधार कार्ड, राशन कार्ड, मतदान कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स इत्यादींचे दोन झेराँक्स
● पासपोर्ट साईज दोन फोटो
● अँड्रेस प्रुफ
● जन्माचा दाखला
● पोस्ट आँफिसचे खाते पासबुक
● प्राँपर्टी टँक्स रिटर्न डाँक्युमेंटस
● वय अधिवास प्रमाणपत्र
● दहावीचा रिझल्ट
● जर समजा एखाद्या व्यक्तीचे इन्कम हे अडीच लाखापेक्षा जास्त आहे तर अशा व्यक्तीसाठी पॅनकार्ड बनविणे फार आवश्यक आहे.
● एखादी व्यक्ती जर व्यवसाय करत असेल आणि त्याची इन्कम पाच लाख पेक्षा जास्त असेल तर त्याला पॅन कार्ड बनविणे अत्यंत आवश्यक आहे.
● आपण जेव्हा कार वगैरे खरेदीचा व्यवहार करत असतो तेव्हा देखील आपल्याला पॅन कार्ड लागते.
● जेव्हा आपण एखादे घर खरेदी करतो तेव्हा त्याची किंमत जर दहा लाखापेक्षा जास्त असेल तेव्हासुदधा आपल्याला तिथे पॅन कार्ड लागते.
● बँक खाते चालु करण्यासाठी देखील आपल्याला पॅन कार्डची आवश्यकता असते.
● जेव्हा आपल्याला स्वतासाठी एखादे क्रेडिट कार्ड बनवायचे असते तेव्हा देखील तेथे आपल्याला पॅन कार्ड लागते.
● तसेच आपण एखादा किराणा खरेदी किंवा त्याची विक्री करत असु आणि दोन लाखाच्या वर असेल ते ही एकाच वेळी खरेदी विक्रीचा व्यवहार करत असताना तिथे देखील आपल्याला पॅन कार्ड लागते.
● त्याचबरोबर आपण एकाच वेळी आपल्या बँक खात्यात पन्नास हजारपेक्षा अधिक रक्कम जमा करत असाल तर तिथे सुदधा आपल्याला पॅन कार्ड लागत असते.
● आपण अशा एखाद्या कंपनीचे शेअर खरेदी करत असाल जी सिक्युर्ड असो किंवा अन्सिक्युर्ड असो आणि आपण खरेदी करत असलेल्या शेअरची किंमत एक लाखापेक्षा अधिक जास्त असेल तर अशा परिस्थितीत देखील आपल्याला पॅन कार्ड लागते.
● पॅन कार्ड हे भारत सरकारद्वारे मान्य करण्यात आले असल्यामुळे प्रत्येक ठिकाणी पॅन कार्डला मान्यता दिली गेली आहे. ज्याचा लाभ आपल्याला सरकारी केंद्रात तसेच रेल्वे इत्यादी ठिकाणी देखील होतो.
● समजा आपण एखाद्या हाँटेल लाँज किंवा रेस्टाँरंट मध्ये राहतो आहे आणि तिथे आपल्याला 25 हजार पेक्षा जास्त पेमंट करावे लागते तिथे देखील आपल्याला उपयुक्त ठरत असते.
जर आपल्याला ऑनलाईन आपले पॅन कार्ड बनवायचे असेल तर आपण दोन वेबसाईटच्या आधारे पॅन कार्ड बनवु शकतो.
1) Nsdl.com
2) Utitsl.com
ह्यात आपण ह्या दोन वेबसाईटच्या द्वारे आपण आपले पॅनकार्ड बनवु शकतो. महत्वाची बाब अशी की आपण ज्या वेबसाईटदवारे आपले पॅन कार्ड बनवत असतो, आपल्या पॅन कार्डचे स्टेटस चेक करण्यासाठी तसेच इतर कोणत्याही तक्रारीसाठी आपल्याला त्याच वेबसाईटवर जाणे अनिवार्य आहे.
समजा आपण आपल्या पॅन कार्डसाठी www.utitsl.com ह्या वेबसाईटवरून अँप्लाय केले असेल तर आपण पुढील पदधतीने आपले अँप्लीकेशन स्टेटस चेक करू शकतो:
● आपल्या pan card application चे status चेक करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम गुगलवर जाऊन पॅन कार्ड स्टेटस असे टाईप करायचे आहे मग तिथे दोन वेबसाईट येतात त्यापैकी ज्या वेबसाईटवरून आपण अर्ज केला आहे आपण तिथे जाऊन आपल्या अँप्लीकेशनचे स्टेटस तपासू शकतो.
● यानंतर utitsl च्या वेबसाईटवर जाऊन आपल्याला आपल्या अँप्लीकेशनचा कुपन नंबर भरायचा असतो जो आपल्याला पॅन कार्डसाठी अँप्लाय केल्यानंतर जी पावती दिली जात असते त्यात दिलेला असतो.मग आपण आपली जन्मतारीख भरावी आणि सबमिट ह्या आँप्शनवर क्लीक करा.
● यानंतर आपल्याला आपल्या पॅन कार्डचे स्टेटस बद्दल माहिती मिळवता येते.
● पॅन कार्ड बनवत असताना आपण आपला स्वताचा मोबाईल नंबर तसेच ईमेल आयडी द्यायचा असतो हे आपण लक्षात ठेवायला हवे. कारण जेव्हा आपण पॅन कार्ड बनवत असतो त्याच्या पाच सहा दिवसांतच आपले पॅन कार्ड आपल्या ईमेल आयडीवर आपल्याला प्राप्त होत असते.म्हणुन आपण पॅन कार्ड बनवताना स्वताचाच मोबाईल नंबर तसेच ईमेल आयडी देणे खुप गरजेचे असते.
अमेझॉन वर प्रत्येक वर्षाच्या ऑक्टोबर मध्ये येणाऱ्या sale मध्ये वस्तू इतक्या स्वस्त का असतात? असा प्रश्न तुम्हाला पडत असेलच, तसेच या सेल मध्ये वस्तू विकत… Read More
NCB विषयी माहीती मराठी Narcotics Control Bureau ही एक गुप्तचर संस्था आहे जिचे प्रमुख काम हे अवैधपणे होणारी ड्रग्जची तस्करी थांबवणे तसेच त्यावर आळा घालणे… Read More
ऑनलाईन शॉपिंग आज स्मार्ट फोन आणि इंटरनेट आल्यामुळे आपणा सर्वाना कोणत्याही वस्तुची घरबसल्या खरेदी करणे अगदी सोपे झाले आहे. एका क्लीकवर आज आपण हजारो नही… Read More