घटनेच्या तरतुदीनुसार राष्ट्रीय आणीबाणी, आर्थिक आणीबाणी आणि राष्ट्रपती राजवट हे मुद्दे आहेत. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला, शासकीय यंत्रणा कोलमडली अथवा त्रिशंकू राजकीय परिस्थिती निर्माण झाली तर राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते. “राष्ट्रपती राजवट” असा शब्द घटनेमध्ये कुठेच आढळत नाही, आणीबाणी साठी केलेली तरतूद म्हणजेच राष्ट्रपती राजवट होय.
शासन आणि विधिमंडळ या दोघांचे अधिकार काढले जातात, अनुक्रमे राष्ट्रपती व संसदेकडे ते वर्ग केले जातात. अप्रत्यक्षरीत्या केंद्राकडे राज्य हस्तांतरित केले जाते. राज्यपालांना विशेष अधिकार दिले जातात आणि राज्यकारभार चालवला जातो. कमीत कमी सहा महिन्यांसाठी राष्ट्रपती राजवट राज्यासाठी लागू केली जाऊ शकते.
भारतीय राज्यघटनेमध्ये दिलेल्या तरतुदीनुसार राज्याचे कामकाज चालत नसेल अथवा घटनेतील मुलतत्वे पाळली जात नसतील तर राष्ट्रपती राजवट लागू करता येते. राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी राज्यपाल राष्ट्रपतींकडे शिफारस करतात. राष्ट्रपतींच्या परवानगीनंतर संसदेमध्ये हा ठराव मांडण्यात येतो आणि दोन महिन्याच्या आत या ठरावाला मंजुरी मिळणे आवश्यक असते.
संसदेमध्ये ठराव मंजूर झाल्यानंतर राष्ट्रपतींच्या आदेशाने राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होते. राज्यकारभार चालवण्यासाठी राज्यपालांना अधिकार दिले जातात. राज्याचे मुख्य सचिव यांच्या मदतीने राज्यपाल राज्यावर नियंत्रण ठेवतात. राज्याबद्दल कुठलाही निर्णय घेण्यासाठी राज्यपाल आणि राज्याचे मुख्य सचिव यांच्याकडे सर्व निर्णय अधिकार असतात.
राष्ट्रपती राजवट मंजूर झाल्यानंतर, उतरते राज्य सरकार सुप्रीम कोर्टाकडे दाद मागू शकते. काही वेळेला केंद्र सरकारचा दबाव येतो आणि त्याप्रकारे राष्ट्रपती राजवट आणण्यात येते. कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार कार्यवाही केली जाते. जर कोर्टाने राज्याच्या बाजूने निर्णय दिला तर पुन्हा सरकार स्थापन करण्यात येऊ शकते. अर्थात, यासाठी बहुमत सिद्ध करावे लागेल.
भारतामध्ये अनेक वेळी राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. या मध्ये इंदीरा गांधी, वाजपेयी, मनमोहनसिग, नरेंद्र मोदी यांच्या कालकीर्दीत राष्ट्रपती शासन लागू करण्यात आले आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत दोन वेळा १९८० आणि २०१४ साली राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. संपूर्ण भारतात आतापर्यंत १३५ पेक्षा जास्त वेळेला राष्ट्रपती राजवट आणण्यात आली आहे. सर्वाधिक वेळा आतापर्यंत मणिपूर या छोट्या राज्यात राष्ट्रपती राजवट आली आहे.
वरील लेखाविषयी आपल्या प्रतिक्रिया खालील चौकटीत नोंदवा.
अमेझॉन वर प्रत्येक वर्षाच्या ऑक्टोबर मध्ये येणाऱ्या sale मध्ये वस्तू इतक्या स्वस्त का असतात? असा प्रश्न तुम्हाला पडत असेलच, तसेच या सेल मध्ये वस्तू विकत… Read More
NCB विषयी माहीती मराठी Narcotics Control Bureau ही एक गुप्तचर संस्था आहे जिचे प्रमुख काम हे अवैधपणे होणारी ड्रग्जची तस्करी थांबवणे तसेच त्यावर आळा घालणे… Read More
ऑनलाईन शॉपिंग आज स्मार्ट फोन आणि इंटरनेट आल्यामुळे आपणा सर्वाना कोणत्याही वस्तुची घरबसल्या खरेदी करणे अगदी सोपे झाले आहे. एका क्लीकवर आज आपण हजारो नही… Read More