Vegan meaning in Marathi
Vegan Meaning in Marathi | व्हेज आणि नॉनवेज हे तर सर्वाना माहित आहे पण; व्हीगन म्हणजे काय? असा प्रश्न बहुतेकांना पडतो. ज्या प्रकारे शाकाहारी आणि मांसाहारी हे आहाराचे प्रकार आहेत तसेच व्हीगन हा एक आहाराचा प्रकार आहे, जो शाकाहारी मध्ये गणला जातो. व्हीगन बद्दल जाणून घेण्यापूर्वी, शाकाहारी आणि मांसाहारी यातील फरक पाहू.
मांसाहारी म्हणजे प्राण्यांचे मांस आणि अंडी खाणारे लोक. या प्राण्यामध्ये कोंबडी, बोकड, शेळी व इतर प्राण्यांचा समावेश होतो. जो माणूस मांसाहारी आहे तो शाकाहार आणि मांसाहार अशा दोन्ही प्रकारचे आहार खातो. मांसाहार न खाणारे लोक म्हणजेच शाकाहारी, या आहारामध्ये धान्य, भाज्या, फळे, दूध आणि इतर गोष्टींचा समावेश होतो. हा झाला या दोन्हीतला फरक. आता जाणून घेऊ व्हीगन आहाराबद्दल बद्दल.
व्हीगन हा शाकाहाराचा एक प्रकार आहे. या प्रकारच्या आहारामध्ये अजून काही गोष्टी वगळल्या आहेत. प्राणी, पक्षी आणि त्यांच्यापासून बनलेल्या अथवा उत्पन्न झालेल्या गोष्टी टाळल्या जातात. ज्यामध्ये दूध, दुग्धजन्य पदार्थ, मध, अंडी यांचा समावेश होतो. म्हणजेच शुद्ध शाकाहारी पेक्षा अधिक पटीने जास्त शाकाहारी. व्हीगन लोक दूध पीत नाहीत तसेच दही, तूप, पनीर, चीज काहीच खात नाहीत. यासाठी इतर पर्यायांचा अवलंब केला जातो. तसेच फक्त सेंद्रिय पद्धतिने उगवलेल्या धान्य, भाज्या, फळे खाल्ले जातात.
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल हे सर्व कशासाठी? तर जगभरात प्राण्यावर प्रेम असणारा आणि त्यांच्या संरक्षणासाठी प्रयत्न करणारा एक मोठा वर्ग आहे. यांच्याकडून व्हीगन हा प्रकार अस्तित्वात आला. पाश्चिमात्य देशामध्ये याची सुरुवात झाली. हळू हळू हा वर्ग वाढत आहे आणि जगभरात Vegan लोक वाढत आहेत. भारतात देखील Vegan हा प्रकार येऊ घातला आहे. व्हीगन लोकांना प्राण्यांबद्दल फार आपुलकी असते आणि ते प्राण्यांची सेवा देखील करतात. (vegan meaning in marathi)
Vegan Diet Food हा नवीन फॅड लोकांमध्ये दिसून येत आहे. Vegan Diet Food हा व्हीगन आहारमधील एक प्रकार आहे. वजन कमी करण्यासाठी हा आहार प्रकार पळाला जातो. यामध्ये सेंद्रिय पद्धतीने उगवलेले धान्य, भाज्या, फळे, फुले अगदी मोजून मापून खाल्ली जातात. या सर्व गोष्टींमध्ये फॅट कमी असतो आणि शरीराला लागणारी पोषकतत्वे देखील मिळतात.
धासाठी पर्याय म्हणून नारळदूध अथवा शेंगादाण्यापासून तयारकेलेले दूध वापरले जाते. चहा आणि इतर दुगद्जन्य पदार्थ या पासून तयार केले जातात. तसेच काजू पासून बटर बनवले जाते. काजू, शेंगदाणा, सोयाबीन पासून पनीर, चीज हे बनवण्यासाठी देखील विशिष्ट पद्धतीचा वापर केले जातो. साध्या दुधाप्रमाणेच हे सर्व पदार्थ देखील आपल्या शरीरासाठी पौष्टिक ठरतात.
मधासाठी देखील इतर पर्याय उपलब्ध आहेत. जसे सफरचंदा पासून बनवलेला मध, झाडांपासून बनवलेला मध. या मध्ये मधमाशी विना आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे मध बनवला जातो. ज्याची चव अस्सल मधासारखी असते आणि पोषक तत्वे देखील सारखीच मिळतात.
ज्यांना मांसाहार सोडायचा आहे अथवा काही कारणाने खायचे नाही त्यांच्यासाठी Vegan meat चा पर्याय उपलब्ध आहे. सोयाबीन पासून हुबेहूब मांस सारखा पदार्थ तयार केला जातो, ज्याची चव, रूप सारखेच असते. अनेक खाद्यपदार्थ बनवणाऱ्या कंपन्या पाकीटबंद व्हेगन मीट बनवतात. Vegan food बाजारात अगदी सहज मिळते या शिवाय तुम्ही ऑनलाईन देखील मागवू शकता.
लोकांमध्ये शाकाहारा विषयी जागरूकता वाढत आहे. तसेच अन्नपदार्थात होणारी भेसळ, रासायनिक पद्धतीने पिकवलेल्या भाज्या फळे या गोष्टींमुळे आपली प्रतिकार शक्ती कमकुवत होत आहे. त्यामुळे व्हीगन आहाराकडे कल वाढत आहे. व्हीगन आहारामुळे पक्षी, प्राणी कत्तल खाण्यात जाण्यापासून वाचत आहेत, तसेच सेंद्रिय शेती साठी चांगले दिवस येत आहेत. (vegan meaning in marathi)
या लेखाबद्दल आपला अभिप्राय आणि प्रतिक्रिया खाली दिलेल्या संपर्क कक्षात नोंदवा.
अमेझॉन वर प्रत्येक वर्षाच्या ऑक्टोबर मध्ये येणाऱ्या sale मध्ये वस्तू इतक्या स्वस्त का असतात? असा प्रश्न तुम्हाला पडत असेलच, तसेच या सेल मध्ये वस्तू विकत… Read More
NCB विषयी माहीती मराठी Narcotics Control Bureau ही एक गुप्तचर संस्था आहे जिचे प्रमुख काम हे अवैधपणे होणारी ड्रग्जची तस्करी थांबवणे तसेच त्यावर आळा घालणे… Read More
ऑनलाईन शॉपिंग आज स्मार्ट फोन आणि इंटरनेट आल्यामुळे आपणा सर्वाना कोणत्याही वस्तुची घरबसल्या खरेदी करणे अगदी सोपे झाले आहे. एका क्लीकवर आज आपण हजारो नही… Read More