तंत्रज्ञान

ओटीटी प्लॅटफॉर्म काय असतं? OTT Platform means in Marathi

शेअर करा

ओटीटी प्लॅटफॉर्म म्हणजे काय ? OTT Platform means in Marathi?

ओटीटी प्लॅटफॉर्म काय असतं? ओटीटी म्हणजे “ओव्हर द टॉप”. आपण घरी असलेल्या टीव्ही वर मालिका, चित्रपट किंवा अन्य कार्यक्रम बघतो त्यासाठी केबल अथवा डिश जोडणे महत्वाचे असते. याउलट OTT साठी अशा कुठल्याच जोडणीची गरज नसते, तर पूर्ण पणे इंटरनेट चा वापर करून हे चालवले जाते. आपल्या मोबाईल अथवा कॉम्पुटर वरून OTT वापरता येते. या वर असणाऱ्या मालिका, चित्रपट किंवा कार्यक्रम बघण्यासाठी महिन्याला/वर्षाला पैसे भरून नोंदणी (Paid Subscription) करावी लागते.

दूरचित्रवाणी

आपण लहान असताना कृष्णधवल (black and white) रंग असणारा दूरचित्रवाणी संच आणि त्यावर फक्त एकच वाहिनी (channel) होती. आठवतंय? दर रविवारी सिनेमा बघण्यासाठी उत्सुक असणारी मंडळी जमा व्हायची, अगदी सगळी कामे सोडून. हळू हळू सर्वाकडे संच आला आणि वाहिन्या सुद्धा वाढल्या. मग क्रिकेट सामने आणि मालिका सुरु झाल्या.

जर त्या काळाची तुलना आत्ताच्या काळाशी करायची झाली तर यार फार मोठी तफावत आहे. आत्ताचा काळ हा ओटीटी चा आहे, टीव्ही ला देखील प्रेक्षक कमी होत आहेत. जेव्हा हवं तेव्हा आपला मोबाईल काढला आणि आवडीचा कार्यक्रम/सिनेमा बघता येतो. यासाठी वाट बघण्याची गरज उरलेली नाही. (OTT Platform means in Marathi)

OTT Platform means in Marathi

ओटीटी चा वापर कसा करतात? How to Use OTT Platform?

इंटरनेट उपलब्ध असेल तर मोबाईल, कॉम्प्युटर, टीव्ही या तिन्ही वर ओटीटी वापरता येते. मोबाईल वर वापरण्यासाठी अप्लिकेशन इन्स्टॉल करावे लागेल. कॉम्प्युटर वर ओटीटी वापरण्यासाठी वेबसाईट चा आधार घ्यावा लागतो. तसेच टीव्ही वर ओटीटीचे अनेक ऍप्स आधीच जोडलेले असतात त्यावर जाऊन तुम्ही ओटीटी चा आनंद घेऊ शकता. यासाठी तुमचा टीव्ही स्मार्ट असणे गरजेचे आहे.

प्रसिध्द OTT प्लॅटफॉर्म

सर्वात जास्त प्रसिद्ध आणि जुना ओटीटी म्हणजे Netflix. मागच्या दोन तीन वर्षात नेटफ्लिक्स ने भारतात अक्षरशः धुमाकूळ घातला. टीव्ही आणि सिनेमे यांचा खरा स्पर्धक नेटफ्लिक्स ठरला. तसेच Amazon Prime, Hotstar, Firestick हे देखील भारतात प्रसिध्द आहेत. या मधील कुठलाही ओटीटी वापरण्यासाठी एक महिन्याचे फुकट ट्रायल मिळते आणि नंतर सेवा चालू ठेवण्यासाठी पैसे भरून नोंदणी करता येते.

निष्कर्ष :

तर OTT Platform म्हणजे टीव्हीचा आधुनिक प्रकार. ज्यासाठी वीज, केबल, डिश अशी कुठली जोडणी गरजेची नसते. तर हवी असते फक्त इंटरनेट सेवा. इंटरनेट च्या माध्यमातून कार्यक्रम, सिनेमा, मालिका, वेब सिरीज यांसाठी सुरु करण्यात आलेली सेवा म्हणजेच OTT Platform. ज्यावर आता खेळ, बातम्या आणि इतर गोष्टी देखील येऊ घातल्या आहेत. (OTT Platform means in Marathi).


रोहित श्रीकांत
Share
Published by
रोहित श्रीकांत

Recent Posts

Amazon Great Indian Festival मध्ये वस्तू इतक्या स्वस्त का असतात? Sale मध्ये कोणकोणत्या गोष्टी विकत घेतल्या पाहिजेत?

अमेझॉन वर प्रत्येक वर्षाच्या ऑक्टोबर मध्ये येणाऱ्या sale मध्ये वस्तू इतक्या स्वस्त का असतात? असा प्रश्न तुम्हाला पडत असेलच, तसेच या सेल मध्ये वस्तू विकत… Read More

2 years ago

NCB विषयी माहीती

NCB विषयी माहीती मराठी Narcotics Control Bureau ही एक गुप्तचर संस्था आहे जिचे प्रमुख काम हे अवैधपणे  होणारी ड्रग्जची तस्करी थांबवणे तसेच त्यावर आळा घालणे… Read More

4 years ago

ऑनलाईन शॉपिंग करताना कोणती काळजी घ्यावी?

ऑनलाईन शॉपिंग आज स्मार्ट फोन आणि इंटरनेट आल्यामुळे आपणा सर्वाना कोणत्याही वस्तुची घरबसल्या खरेदी करणे अगदी सोपे झाले आहे. एका क्लीकवर आज आपण हजारो नही… Read More

4 years ago