Matichi bhandi information in Marathi | बदलत्या जीवनशैली मूळे आपली प्रतिकार शक्ती कमी होत आहे. भाजीपाला आणि धान्य लागवडी साठी वापरल्या जाणाऱ्या खात आणि कीटकनाशका मुळे अनेक आजार होत आहेत. तसेच खाण्यामध्ये वापरल्या जाणाऱ्या गोष्टींमध्ये भेसळ होत आहे आणि शारीरिक आजार वाढत आहेत.
आजकाल सर्वांच्या किचन मध्ये नॉनस्टिक भांड्यांचा सर्रास वापर होतोय, जे आपल्या तब्येतीसाठी अयोग्य आहेत. एका विशिष्ट तापमान च्या वर तापले गेले तर या भांड्यातून विषारी वायू तयार होऊन अन्न पदार्थात मिसळतात. अशा अन्नाचा सेवना नंतर हृदय संबंधी अनेक आजार उद्भवतात. माती पासून बनवलेली भांडी यावर उत्तम पर्याय आहेत. मातीची भांडी मराठी माहिती:
मातीची भांडी मराठी माहिती । भारतात अनेक वर्षांपासून मातीच्या भांड्यांचा वापर केला जातो. मातीचा चिखल बनवून त्याला आकार दिला जातो.याला व्यवस्थित सुकवल्यानंतर आगी मध्ये भाजले जाते. काळी माती आणि लाल मातीचा वापर करून भारतात भांडी बनवली जातात. वेगवेगळया ठिकाणावर आणि उपलब्धतेनुसार काळी माती आणि लाल माती वापरली जाते.
ऍल्युमिनिअम, नॉनस्टिक (teflon) भांडी या पासून अनेक आजार होतात. या भांड्यांचा वापर जर जास्त कालावधी साठी केला तर गंभीर आजार होण्याची शक्यता असते. सतत या भांड्यामध्ये स्वयंपाक केला तर आपल्या हृदयामध्ये आणि रक्तामध्ये अनेक विषारी कण मिसळतात आणि हळू हळू आपल्या अवयवांवर परिणाम करतात. आपल्या घरी असणारे ऍल्युमिनिअम चे भांडे पहा, नवीन आणल्यानंतर असलेला रंग आणि आता झालेला रंग यावरून आपल्याला याची दाहकता समजेल.
मातीची भांडी वापरण्याचे फायदे अनेक आहेत, त्यामुळे या एका छोट्या बदलामुळे आपले आयुर्मान चांगले होईल आणि तब्येत देखील उत्तम राहील. तसेच निसर्गाचा होणार ह्रास हा देखील कमी करता येईल. उत्तम आरोग्य आणि चांगली प्रतिकार शक्ती आजच्या प्रदूषण ग्रस्त वातावरणात गरजेची आहे. बदल हा नेहमी प्रगतीचे लक्षण असतो.
या लेखाबद्दल आपला अभिप्राय आणि प्रतिक्रिया खाली दिलेल्या संपर्क कक्षात नोंदवा.
अमेझॉन वर प्रत्येक वर्षाच्या ऑक्टोबर मध्ये येणाऱ्या sale मध्ये वस्तू इतक्या स्वस्त का असतात? असा प्रश्न तुम्हाला पडत असेलच, तसेच या सेल मध्ये वस्तू विकत… Read More
NCB विषयी माहीती मराठी Narcotics Control Bureau ही एक गुप्तचर संस्था आहे जिचे प्रमुख काम हे अवैधपणे होणारी ड्रग्जची तस्करी थांबवणे तसेच त्यावर आळा घालणे… Read More
ऑनलाईन शॉपिंग आज स्मार्ट फोन आणि इंटरनेट आल्यामुळे आपणा सर्वाना कोणत्याही वस्तुची घरबसल्या खरेदी करणे अगदी सोपे झाले आहे. एका क्लीकवर आज आपण हजारो नही… Read More