तंत्रज्ञान

Digital Marketing in Marathi – मार्केटिंग चे आधुनिक पर्याय

शेअर करा

एकविसाव्या शतकात सर्वच गोष्टीत फार मोठे बदल होत आहेत, त्यास आधुनिकीकरण हे सर्वात मोठे कारण आहे. अलीकडच्या काळात जाहिरात करण्याच्या पद्धती मध्ये खूप बदल झाले आहेत.पाच-सात वर्षाआधी मार्केटिंग ही पारंपरिक पद्द्धतीने करण्यात यायची. त्यात पोस्टर्स, पॅम्प्लेट्स, वर्तमानपत्रातील जाहिरात ही मुख्य पर्याय होते. पण आधुनिकीकरणामुळे आता सर्व काही एका क्लीकवर उपलब्ध असल्याने, ऑनलाईन मार्केटिंग (Digital Marketing) कडे कल वाढत आहे जाणून घेऊया त्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पद्धती बद्दल. (Digital Marketing in Marathi)

सोशल मीडिया द्वारे जाहिरात

digital marketing in Marathi 

आज काल प्रत्येक व्यक्ती स्मार्ट फोन वापरत आहेत, त्यामुळे सहजिकच ते सोशल मीडिया चा पण वापर करत आहेत. यात मोठा तरुण वर्ग आहेच त्यात घरातील इतर मंडळी पण याचा हळू हळू वापर करत आहे. Whatsapp, Facebook, Instagram, twitter या सर्व सोशल साईट वरती आपल्या उद्योगाची प्रोफाइल किंवा पेज बनवून आपण जाहिरात करू शकतो. हि अगदी सोपी पद्धत आहे आणि कमी खर्चिक. पण त्यासाठी थोडी-फार माहिती घ्यावी लागेल. आणि हे तुम्ही स्वतः करू शकता.

Google वरती जाहीरात

ही पद्धत थोडी खर्चिक आहे पण या मध्ये लगेच परिणाम मिळतील. मध्यम वर्गात असणारे उद्योग याचा अवलंब करू शकतात आणि या साठी संकेतस्थळ असणे आवश्यक आहे. Google द्वारे जाहिराती साठी मुख्य २ प्रकार आहेत, Search आणि Display Advertisement . Google Search मध्ये तुमचे संकेतस्थळ सर्वात वरती आणू शकता. तुमच्या उद्योगाच्या प्रकारावर याचा खर्च ठरतो. Diaplay मध्ये तुम्ही एखाद्या फोटो द्वारे जाहिराती करू शकता, ज्यावर तुमच्या उद्योगाबद्दल सर्व माहिती दिली असेल.तसेच विना खर्च जाहिराती साठी गुगल टूल्स चा देखील वापर करू शकता. त्या पैकी एक म्हणजे Search Engine Optimization .

ई-मेल द्वारे मार्केटिंग

digital marketing

एकाच वेळी शेकडो लोकांना आपण ई-मेल पाठवू शकतो, जेणेकरून एका क्लिक वर आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचू शकतो. या साठी लागणारे ई-मेल टेम्प्लेट इंटरनेट वर सहज उपलब्ध होईल. आणि काही साईट्स अश्या आहेत ज्या आपल्याला विना पैसे टेम्प्लेट आणि इमेल्स ची सेवा देतात. या साठी ई-मेल यादी असणे आवश्यक आहे, जेणेकरून आपण एकदाच यादी टाकून ई-मेल पाठवू शकतो..

SMS द्वारे जाहिरात

Digital Marketing in Marathi

आजकाल स्मार्ट फोन सगळ्याकडे आहे, त्यामुळे मेसेज सेवा जास्त लोक वापरात नाहीत. पण अनेक अशी महत्वाचे काम आहेत जे SMS द्वारे होतात. कमी शब्दात आणि लवकर जाहिरात SMS द्वारे शक्य आहे. इंटरनेट वरती अनेक साईट्स आहेत ज्या दिवसाला १००० पेक्षा जास्त SMS मोफक्त देतात. तेहते आपली कॉन्टॅक्ट यादी टाकून आपण SMS पाठवू शकता. (Digital Marketing in Marathi).

तंत्रज्ञानाविषयी इतर लेख वाचण्यासाठी  तंत्रज्ञानया पानाला भेट द्या.  


वरील लेखाबद्दल आपल्या प्रतिक्रिया खाली दिलेल्या संपर्क कक्षा मध्ये नोंदवू शकता.

रोहित श्रीकांत
Share
Published by
रोहित श्रीकांत

Recent Posts

Amazon Great Indian Festival मध्ये वस्तू इतक्या स्वस्त का असतात? Sale मध्ये कोणकोणत्या गोष्टी विकत घेतल्या पाहिजेत?

अमेझॉन वर प्रत्येक वर्षाच्या ऑक्टोबर मध्ये येणाऱ्या sale मध्ये वस्तू इतक्या स्वस्त का असतात? असा प्रश्न तुम्हाला पडत असेलच, तसेच या सेल मध्ये वस्तू विकत… Read More

2 years ago

NCB विषयी माहीती

NCB विषयी माहीती मराठी Narcotics Control Bureau ही एक गुप्तचर संस्था आहे जिचे प्रमुख काम हे अवैधपणे  होणारी ड्रग्जची तस्करी थांबवणे तसेच त्यावर आळा घालणे… Read More

4 years ago

ऑनलाईन शॉपिंग करताना कोणती काळजी घ्यावी?

ऑनलाईन शॉपिंग आज स्मार्ट फोन आणि इंटरनेट आल्यामुळे आपणा सर्वाना कोणत्याही वस्तुची घरबसल्या खरेदी करणे अगदी सोपे झाले आहे. एका क्लीकवर आज आपण हजारो नही… Read More

4 years ago